Ranji Trophy 2024-25 : आयुष म्हात्रेची शतकी खेळी, पहिल्याच दिवशी मुंबईकडे आघाडी…

Ranji Trophy 2024-25 (Maharashtra vs Mumbai) :- मोहित अवस्थी व शम्स मुलानी यांच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर मुंबई संघाने महाराष्ट्राच्या धाव गुंडाळल्यानंतर पहिल्याच दिवशी मुंबईच्या आयुष म्हात्रेने दमदार शतकी खेळी करताना मुंबईला रणजी स्पर्धेत 94 धावांची आघाडी मिळवून दिली.
Ranji Trophy 2024-25: Maharashtra Fights Hard!
Despite a tough first innings, Maharashtra showed resilience with crucial contributions from Naik and Kazi. Watch out for a strong comeback on Day 2! #MaharashtraStrong #RanjiTrophy pic.twitter.com/8ee0DYfX7x— Maharashtra Cricket Association (@MahaCricket) October 18, 2024
मोहित अवस्थी व शम्स मुलानी यांनी प्रत्येकी 3 गडी बाद करताना महाराष्ट्राचा डाव केवळ 31.4 षटकांत 126 धावांवर संपविला. महाराष्ट्राच्या डावाची सुरुवात अतिशय खराब झाली. कर्णधार ऋतुराज गायकवाडला भोपळा देखील फोडता आला नाही. त्यानंतर सचिन धस (०), सिद्धेश वीर (11), अंकित बावणे (17), सत्यजित बच्छाव (08) व अर्शिन कुलकर्णी (14) हे झटपट परतल्याने महाराष्ट्राला मोठी धावसंख्या उभारता आली नाही.
महाराष्ट्राची अवस्था 6 बाद 59 अशी झाली असताना अझीम काझी व यष्टिरक्षक निखिल नाईक यांनी अर्धशतकी भागीदारी करताना महाराष्ट्राला 100 धावांचा टप्पा गाठून दिला. अझीम काझीने 36 तर निखिल नाईकने 38 धावांची खेळी केली. त्यानंतर महाराष्ट्राचा डाव 126 धावांत संपुष्टात आला. रॉयस्टन डायस व शार्दूल ठाकूर यांनी प्रत्येकी 2 बळी टिपले.
मुंबई संघाने पहिल्या दिवसअखेर 49 षटकांत 3 बाद 220 धावांपर्यंत मजल मारली. पृथ्वी शॉ (1) व हार्दिक तामोरे (4) हे झटपट बाद झाल्याने मुंबईची अवस्था 2 बाद 24 झाली होती. त्यावेळी सलामीवीर आयुष म्हात्रेने एका बाजूने दमदार फलंदाजी करताना शतकी खेळी केली. आयुषने 163 चेंडूत 17 चौकार व 3 षटकार मारताना 127 धावांवर नाबाद राहिला. त्याला कर्णधार अजिंक्य रहाणे 31 तर श्रेयस अय्यरने नाबाद 45 धावांची सुरेख साथ दिली




