Ranji Trophy 2024-25 : सेनादलाची महाराष्ट्रावर मात, अमितकुमार शुक्लाचे 11 बळी….

Ranji Trophy 2024-25 (Maharashtra vs Services) :- अमितकुमार शुक्लाच्या ११ बळींच्या जोरावर रणजी करंडक स्पर्धेत सेनादलाने महाराष्ट्र संघावर अवघ्या ३५ धावांनी विजय मिळविला.
#RanjiTrophy produced yet another tight finish as Services beat Maharashtra by 35 runs on the final day! 🔥
Defending 339, Services bowled Maharashtra out for 303.
Watch 📽️ highlights of a thrilling day’s play 🔽https://t.co/MRdYKP1QxK
— BCCI Domestic (@BCCIdomestic) November 9, 2024
सुरज वसिष्ठ, शुभम रोहिल्ला, रवी चौहान व रजत पालीवाल यांच्या अर्धशतकाच्या जोरावर पहिल्या डावात सेनादलाने २९३ धावांपर्यत मजल मारली होती. अमितकुमारच्या गोलंदाजीसमोर महाराष्ट्राचा डाव १८५ धावांमध्ये मर्यादित राहिला. अमितकुमारने पहिल्या डावात महाराष्ट्राच्या ७ फलंदाजांना तंबूत पाठविले.
कर्णधार अंकित बावणेने एकाकी किल्ला लढविताना ७३ धावांची खेळी केली. इतर फलंदाज विशेष काहीच करू शकले नाही. दुसऱ्या डावात सेनादला ने २३० धावा केल्या. यामध्ये अमितकुमार शुक्लाने ५१ धावांची खेळी केली. अर्जुन शर्माने ३५, रजत पालीवालने २८, रवी चौहानने २७ धावांची खेळी करताना विजयासाठी महाराष्ट्राला ३३९ धावांचे आव्हान दिले.
Ranji Trophy 2024-25 : अय्यरचे द्विशतक अन् मुलाणीचे 11 बळी; मुंबईने ओडिशावर नोंदवला मोठा विजय…
महाराष्ट्राला हे आव्हान पेलविले नाही. दुसऱ्या डावात कर्णधार अंकित बावणे, सौरभ नवले यांनी अर्धशतकी खेळी करताना ३०३ धावपर्यंत मजल मारली. अंकित बावणेने नाबाद ९४ धावांची खेळी केली. त्याला सौरभ नवलेने ५६ धावा करताना सुरेख साथ दिली. सत्यजित बच्छावने ४२ सचिन धसने ४४ धावा केल्या, परंतु ते संघाला विजय मिळवून देण्यास अपयशी ठरले. दुसऱ्या डावात देखील अमितकुमार शुक्लाने ९४ धावांच्या मोबदल्यात ४ तर पुलकित नारंगने ८७ धावांच्या मोबदल्यात ६ गडी बाद करताना महाराष्ट्रावर विजय मिळविला.





