Ranji Trophy 2024-25 : आयपीएलच्या मेगा लिलावापूर्वी रजत पाटीदारची धमाकेदार कामगिरी, ठोकलं विक्रमी शतक…

Ranji Trophy 2024-25 : एकीकडे, आयपीएल 2025 च्या मेगा लिलावापूर्वी रिटेन आणि रिलीज केलेल्या खेळाडूंच्या यादी फ्रँचायझींना 31 ऑक्टोबरपर्यंत जाहीर करायची आहे, तर दुसरीकडे खेळाडू रणजी ट्रॉफीपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपर्यंत फ्रँचायझींना आकर्षित करण्यासाठी कोणतीही कसर सोडत नाहीत. दरम्यान, इंदूर येथे रणजी ट्रॉफी 2024-25 सामन्याच्या चौथ्या दिवशी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या रजत पाटीदारने हरियाणा विरुद्ध मध्य प्रदेश संघासाठी शानदार फलंदाजी केली.
मध्य प्रदेशचा दमदार खेळाडू रजत पाटीदारने दमदार कामगिरी केली आहे. त्याने रणजी ट्रॉफी 2024-25 च्या सामन्यात 68 चेंडूत शतक केले आहे. जे रणजी ट्रॉफीमध्ये मध्य प्रदेशच्या कोणत्याही फलंदाजाने झळकावलेले सर्वात जलद शतक आहे. अशाप्रकारे त्याने एक विशेष विक्रम आपल्या नावावर नोंदवला. मात्र, पाटीदारला रणजीतील जलद शतकाचा विक्रम मोडता आला नाही. पाटीदारचे शतक हे रणजी ट्रॉफीच्या इतिहासातील पाचवे जलद शतक ठरले. हरियाणाविरुद्धच्या सामन्यात तो 102 चेंडूंत 13 चौकार अन् 7 षटकारासह 159 धावा काढून बाद झाला.
रणजी ट्रॉफीतील सर्वात वेगवान शतक….
1. ऋषभ पंत- 48 चेंडू (2016/17)
2. रियान पराग- 56 चेंडू (2023/24)
3. आरके बोरा- 56 चेंडू (1987/88)
4. एस रुबेन पॉल- 60 चेंडू (1995/96)
5. रजत पाटीदार- 68 चेंडू (2024-25)
आयपीएल 2025 साठीचा मेगा लिलाव या वर्षी नोव्हेंबर महिन्यात होणार आहे. याआधी, संघ रिटेन खेळाडूंची यादी जाहीर करतील. पाटीदारला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून रिटेन करू शकते. जर त्याला रिलीज केल्यास लिलावात मोठी बोली लागेल. पाटीदार हा स्फोटक फलंदाजीमध्ये निपुण असून त्यांनी अनेकवेळा ते सिध्द केले आहे. रणजी ट्रॉफी सामन्यात हरियाणाविरुद्धही त्याने आज अशीच कामगिरी केली आहे.
IPL 2025 : दिवाळीत होणार मोठा धमाका, रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी ‘या’ तारखेला येणार समोर…
वास्तविक, रणजी ट्रॉफी एलिट 2024-25 चा एक सामना हरियाणा आणि मध्य प्रदेश यांच्यात खेळला जात आहे. इंदूरच्या होळकर स्टेडियमवर या सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे. पाटीदार मध्य प्रदेशसाठी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला. या काळात त्याने आक्रमक फलंदाजी करत शतक झळकावले. यासाठी त्याने 68 चेंडू घेतले. पाटीदार याचे हे विक्रमी शतक होते.
असा आहे पाटीदाराचा फर्स्ट क्लास रेकॉर्ड…
रजत पाटीदारने टीम इंडियासाठी तीन कसोटी सामने खेळले आहेत. मात्र या काळात त्याला विशेष काही करता आले नाही. त्याने भारतासाठी एक वनडे सामनाही खेळला आहे. रजत पाटीदारचा देशांतर्गत सामन्यांमध्ये चांगला रेकॉर्ड आहे. त्याने 63 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 4344 धावा केल्या आहेत. त्याने 12 शतके आणि 23 अर्धशतके केली आहेत. या फॉरमॅटमध्ये पाटीदारची सर्वोत्तम धावसंख्या 196 अशी आहे.





