Ramiz Raja : भारत-पाक वादात रमीज राजांचा दावा फसवा, पायक्रॉफ्टबाबत सत्य आलं समोर!

Ramiz Raja on Andy Pycroft : आशिया कप 2025 च्या ग्रुप-ए मध्ये 14 सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याने क्रिकेट विश्वात खळबळ माजवली आहे. या सामन्यात भारतीय संघातील एकाही खेळाडूने पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन केले नाही, ज्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) आणि त्यांच्या संघाकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. आता रमीझ राजा यांच्या वक्तव्याने नवा वाद पेटला आहे.
या प्रकरणी पीसीबीने सामन्याचे रेफरी अँडी पायक्रॉफ्ट यांच्याविरुद्ध आयसीसीकडे तक्रार दाखल करत त्यांना काढून टाकण्याची मागणी केली होती. मात्र, आयसीसीने ही मागणी पूर्णपणे फेटाळून लावली. या निर्णयानंतर पाकिस्तानने प्रथम युएईविरुद्धचा सामना खेळण्यास नकार दिला, परंतु नंतर ते खेळण्यास तयार झाले. या संपूर्ण वादावर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे माजी अध्यक्ष रमीझ राजा यांनीही आपले मत व्यक्त केले.
रमीझ राजांचा पायक्रॉफ्टवर गंभीर आरोप –
Controversial match referee “Andy Pycroft is a favourite of India. He has been the referee 90 times in India’s matches” says Ramiz Raja pic.twitter.com/JdwGi54nJ5
— Ihtisham Ul Haq (@iihtishamm) September 17, 2025
त्यांनी रेफरी अँडी पायक्रॉफ्ट यांच्यावर पक्षपाताचा आरोप करत दावा केला की, पायक्रॉफ्ट नेहमीच भारतीय संघाच्या सामन्यांमध्ये रेफरी म्हणून उपस्थित असतात. रमीझ राजा म्हणाले, “माझ्या मते, जेव्हाही भारताचा सामना असतो, तेव्हा अँडी पायक्रॉफ्ट रेफरी असतात. मी ज्या टॉस दरम्यान उपस्थित होतो, तिथे ते नेहमीच दिसले. डेटानुसार, ते 90 वेळा भारताच्या सामन्यांमध्ये रेफरी होते. मला हे विचित्र वाटते, कारण रेफरी तटस्थ असायला हवा, पण ते भारतीय सामन्यांमध्येच जास्त दिसतात.”
हेही वाचा – UAE vs PAK : पाकिस्तानच्या सैम अयुबची खाते उघडण्यासाठी धडपड, आशिया कपमध्ये साधली डकची हॅटट्रिक!
रमीझ राजांचा दावा ठरला खोटा –
रमीझ राजा यांनी अँडी पायक्रॉफ्ट यांच्यावर लावलेला पक्षपाताचा आरोप डेटाच्या आधारे चुकीचा ठरला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही प्रारूपांमध्ये (कसोटी, एकदिवसीय आणि टी-20) अँडी पायक्रॉफ्ट यांनी भारतीय संघाच्या 124 सामन्यांमध्ये रेफरीची भूमिका बजावली आहे.
हेही वाचा – INDW vs AUSW : स्मृतीच्या शतकाने भारताचा ऐतिहासिक विजय, ऑस्ट्रेलियाचा सर्वात मोठा पराभव!
रेकॉर्डनुसार पाकिस्तानच्या सामन्यांमध्ये त्यांनी 102 सामन्यांमध्ये रेफरी म्हणून काम पाहिले आहे. त्यामुळे रमीझ राजा यांचा पायक्रॉफ्ट हे भारतीय संघाच्या बाजूने पक्षपात करतात, हा दावा पूर्णपणे खोटा ठरतो.या वादामुळे भारत-पाकिस्तान सामन्यावरील चर्चा आणखी तीव्र झाली असून, क्रिकेटप्रेमींमध्ये याबाबत विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.





