UAE vs PAK : पाकिस्तानच्या सैम अयुबची खाते उघडण्यासाठी धडपड, आशिया कपमध्ये साधली डकची हॅटट्रिक!

पहिल्या ओव्हरमध्येच मोठा धक्का –
यूएईचा कर्णधार मोहम्मद वसीमने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पाकिस्तानने आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन बदल केले, तर यूएईने एक बदल केला. टॉस हरल्यानंतर प्रथम फलंदाजीला उतरलेल्या पाकिस्तानला पहिल्याच ओव्हरमध्ये मोठा धक्का बसला.पाकिस्तानच्या सलामीवीर सैम अयुब आणि साहिबजादा फरहान यांनी डावाची सुरुवात केली.
यूएईकडून पहिली ओव्हर टाकण्यासाठी आलेल्या जुनैद सिद्दीकीने आक्रमक गोलंदाजी करत पाकिस्तानवर दडपण आणले. सिद्दीकीने पहिल्या ओव्हरच्या पाचव्या चेंडूवर सैम अयुबला बाद करत पाकिस्तानला मोठा धक्का दिला. जुनैदने ऑफ स्टंपच्या बाहेर टाकलेल्या बॅक ऑफ लेंथ चेंडूवर सैम अयूबने आक्रमक फटका मारण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडू थेट डीप थर्डमॅनला उभ्या असलेल्या क्षेत्ररक्षकाच्या हाती गेला. सैम अयुब दोन चेंडू खेळून खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला.
हेही वाचा – INDW vs AUSW : स्मृतीच्या शतकाने भारताचा ऐतिहासिक विजय, ऑस्ट्रेलियाचा सर्वात मोठा पराभव!
सैम अयुबने साधली डकची हॅटट्रिक –
सैम अयुबने सलग तिसऱ्या सामन्यात खाते न उघडता बाद होण्याची हॅटट्रिक साधली. गेल्या सहा सामन्यांमध्ये त्याला चौथ्यांदा शून्यावर बाद झाला आहे. यापूर्वीच्या दोन सामन्यांमध्ये त्याला गोल्डन डकचा सामना करावा लागला होता.
आशिया कपमधील सैमचा खराब फॉर्म याप्रकारे आहे:
- ओमानविरुद्ध: गोल्डन डक
- भारताविरुद्ध: गोल्डन डक
- यूएईविरुद्ध: दोन चेंडूंवर डक
हेही वाचा – UAE vs PAK : पाकिस्तानचा यूटर्न; आशिया कप 2025 मधील UAE सामन्यावरील बहिष्कार मागे
टी-20 आंतरराष्ट्रीयमध्ये सर्वाधिक डकचा विक्रम –
सैम अयुबने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक डकच्या बाबतीत पाकिस्तानचा माजी खेळाडू शाहिद आफ्रिदीच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. दोघांच्या नावावर प्रत्येकी 8 डक आहेत. आता सैम अयूब सर्वाधिक डकच्या विश्वविक्रमापासून केवळ तीन पावले दूर आहे. पाकिस्तानला आता या सामन्यात सावरण्यासाठी मोठ्या भागीदारीची गरज आहे, तर UAE ची गोलंदाजी आक्रमकपणे सुरू आहे.





