Rajkumari Wushu Medal : राजकुमारी लांचेनबी चानूने यूथ ऑलिम्पिकमध्ये रचला इतिहास; वुशू खेळात भारताला जिंकून दिले पहिले पदक
Rajkumari Wushu Medal : मणिपूरच्या वुशू खेळाडू लान्छेनबी चानूने २०२६ च्या युवा ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकून इतिहास रचला आहे.

Rajkumari Lanchenbee Chanu Wins Bronze Medal In Wushu Youth Olympics 2026 : भारताची युवा वुशू खेळाडू राजकुमारी लांचेनबी चानू हिने यूथ ऑलिम्पिक २०२६ स्पर्धेत पदक जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली आहे. मणिपूरच्या या प्रतिभावान खेळाडूने महिला चांगक्वान संयुक्त (Combined) स्पर्धेत कास्यपदक (Bronze Medal) पटकावले. या अद्वितीय यशासह यूथ ऑलिम्पिकमधील वुशू स्पर्धेत पदक जिंकणारी ती पहिलीच भारतीय खेळाडू ठरली आहे. विशेष म्हणजे यूथ ऑलिम्पिकमध्ये वुशू खेळाचा पहिल्यांदाच समावेश करण्यात आला असून, पहिल्याच प्रयत्नात चानूने देशाचा तिरंगा फडकवला आहे.
गुन्शू आणि चांगक्वानमध्ये दमदार खेळ; मिळवले १८.०३९ गुण
चानूने गुन्शू (शस्त्रासह सादर केली जाणारी पद्धत) आणि चांगक्वान (विना शस्त्र पद्धत) या दोन्ही फेऱ्यांमध्ये मिळून एकूण १८.०३९ गुण मिळवत तिसरे स्थान पटकावले. या स्पर्धेत इजिप्तच्या सोंडोस सोनबोलने १८.६६० गुणांसह सुवर्णपदक जिंकले, तर व्हेनेझुएलाच्या व्हॅलेरिया फ्रॅनरीस डुडामेलने १८.१९९ गुणांची कमाई करत रौप्यपदकावर नाव कोरले. चानूने सुरुवातीपासून दाखवलेला तोल आणि चपळता यामुळे ती पदकाची मानकरी ठरली.
काय असतात गुन्शू आणि चांगक्वान इव्हेंट?
A historic podium finish for India! 🇮🇳🥉
Rajkumari Lanchenbi Chanu clinches bronze in the Women’s Changquan Combined event at #Dakar2026 with a combined score of 18.039! ✨
#YouthOlympics #Olympics https://t.co/DywcHFvwCp
— Olympic Khel ™ (@OlympicKhel) November 3, 2026
चांगक्वान (लाँग फिस्ट) आणि गुन्शू (स्टाफ/काठी) हे वुशू क्रीडा प्रकारातील दोन अत्यंत कठीण रूटीन आहेत, ज्यांचा एकत्रित गुण काढून निकाल लावला जातो. चांगक्वान ही उत्तर चीनमधून उगम पावलेली विना शस्त्राची जलद शैली आहे, ज्यामध्ये लांब पल्ल्याच्या हालचाली, डीप स्टान्स, वेगवान ठोसे, किक्स आणि कसरतींचा समावेश असतो; तर गुन्शूमध्ये शस्त्राच्या वापराचे संतुलन आणि अचूकता तपासली जाते.
भारताच्या खात्यात आता ३ पदके; धावपटू व जलतरणपटूंचीही चमक
A moment to cherish for Rajkumari Lanchenbi Chanu! 🇮🇳🥉
Watch her celebrate her podium finish at the Youth Olympic Games.
#Dakar2026 #YouthOlympics #Wushu https://t.co/D7X4GQtviL
— Olympic Khel ™ (@OlympicKhel) November 3, 2026
यूथ ऑलिम्पिक २०२६ मधील भारतीय खेळाडूंची मोहीम कमालीची यशस्वी ठरत आहे. भारताने आतापर्यंत १ रौप्य आणि २ कास्य अशी एकूण तीन पदके जिंकली आहेत. यापूर्वी युवा जुडो खेळाडू खुशबू राजकभाई हिने ज्युडोमध्ये रौप्यपदक पटकावले होते, तर जलतरणपटू धिनिधी देसिंघू हिने महिला १०० मीटर फ्रीस्टाईल प्रकारात चमकदार कामगिरी करत भारतासाठी कास्यपदक जिंकले होते. आता चानूच्या पदकामुळे भारताचा पदकतालिकेतील प्रवास आणखी मजबूत झाला आहे.





