Arshdeep Singh Celebration : ऑकलंडमध्ये विकेट घेताच अर्शदीपचा भन्नाट डान्स; गर्लफ्रेंड समरीनसाठी मैदानात केली ‘खास’ कृती, पाहा VIDEO
Arshdeep Singh Celebration : अर्शदीपने विकेट मिळताच मजेशीर सेलिब्रेशन केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. सामन्यानंतर बोलताना अर्शदीपने हे खास सेलिब्रेशन आपली गर्लफ्रेंड समरीन कौरसाठी असल्याचे स्पष्ट केले.

Arshdeep Singh Special Celebration For Girlfriend Samreen Kaur 1st ODI Auckland : न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाने डकवर्थ-लुईस (DLS) नियमानुसार ५ गडी राखून दिमाखदार विजय मिळवला. भारतीय गोलंदाजांनी भेदक मारा करत किवींचा संपूर्ण डाव अवघ्या १८५ धावांवर गुंडाळला होता. या विजयाचा मुख्य शिलेदार ठरला वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग, ज्याने सर्वाधिक ४ विकेट्ल घेतल्या. काईल जेमिसनची विकेट घेतल्यानंतर अनोखे सेलिब्रेशन केले. या सेलिब्रेशनबद्दल त्याने सामन्यानंतर खुलासा केला.
‘मूड ठीक करण्यासाठी आम्ही असा डान्स करतो’; अर्शदीपने सांगितले कारण
आपल्या या व्हायरल सेलिब्रेशनमागील किस्सा सांगताना अर्शदीप म्हणाला, “हे सेलिब्रेशन माझ्या गर्लफ्रेंडसाठी होते. आम्ही जेव्हा बाहेर फिरायला जातो, तेव्हा अनेकदा हे डान्स स्टेप्स करतो. आमच्या दोघांपैकी कोणाचाही मूड थोडा खराब किंवा उदास असला, की दुसरा व्यक्ती त्याचा मूड ठीक करण्यासाठी आणि हसवण्यासाठी अशा स्टेप्स करतो. त्यामुळे ऑकलंडच्या मैदानावर मी केलेले सेलिब्रेशम तिच्यासाठीच होते.” उल्लेखनीय म्हणजे जुलै २०२६ मध्ये अर्शदीप आणि पंजाबी अभिनेत्री-मॉडेल समरीन कौर यांनी सोशल मीडियावर आपले नाते जाहीर केले होते.
न्यूझीलंडमधील परिस्थिती गोलंदाजांसाठी अनुकूल –
A warrior’s spell, a match-winning impact! ⚡
Arshdeep Singh spearheaded India’s bowling attack with a sensational four-wicket haul to help seal an emphatic win! ✨
Watch the HERO VIDA India Tour of New Zealand 1st ODI, LIVE NOW on Sony Sports Network TV channels, Sony Vizha and Sony LIV.
#SonySportsNetwork #SonyVizha #SonyLIV #NZvIND
— Sony Sports Network (@SonySportsNetwk) November 4, 2026
पहिला डाव संपल्यानंतर धावसंख्येवर बोलताना अर्शदीप म्हणाला की, १८५ ही समाधानकारक धावसंख्या होती आणि खेळपट्टीनुसार संयमाने फलंदाजी केल्यास आम्ही सहज जिंकू याची खात्री होती. न्यूझीलंडमधील वातावरणाबाबत तो म्हणाला, “भारतातून आल्यानंतर येथील खेळपट्ट्यांवर उसळी आणि वेग मिळतो, त्यामुळे इथे गोलंदाजी करणे नेहमीच आनंददायी ठरते. शिवाय मैदानावरील वाऱ्याची दिशाही स्विंग मिळवण्यासाठी खूप मदत करत होती.”
‘विकेटच्या लालसेपोटी अखेरच्या षटकात जास्त धावा दिल्या’ –
🔴 ARSHDEEP SINGH DIDN’T HESITATE TO SAY THIS! 😭
Q 🎙️: What was the reason behind your celebration?
Arshdeep Singh 🎙️: “The celebration was for my girlfriend.” ❤️😭 https://t.co/x59UtRnNY3
— Sam (@cricsam02) November 4, 2026
न्यूझीलंडने अखेरच्या गड्यासाठी ३९ धावांची भागीदारी रचली होती. ही जोडी फोडण्याच्या नादात अर्शदीपने आपल्या शेवटच्या षटकात तब्बल २३ धावा दिल्या. त्यावर मोकळेपणाने कबुली देत तो म्हणाला, “शेवटच्या क्षणी आम्ही थोडे लालची झालो होतो आणि केवळ विकेट काढण्याच्या मागे लागलो. सुरुवातीपासून जी अचूक लेन्थ ठेवली होती, तीच कायम ठेवायला हवी होती; पण विकेटच्या लालसेमुळे शेवटी काही अतिरिक्त धावा गेल्या.”
पाचवी विकेट हुकल्याची खंत; शॉर्ट बॉल्सची रणनीती ठरली यशस्वी
आपल्या रणनीतीबद्दल बोलताना अर्शदीपने सांगितले की, खेळपट्टीवर मदत असल्याने आम्ही सीमवर चेंडू जोरात आदळण्याचा प्रयत्न केला आणि किवी फलंदाजांनी त्या लेंथवर मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न केल्याने आम्हाला विकेट्स मिळाल्या. डावातील आवडत्या विकेटबद्दल विचारले असता अर्शदीप हसत म्हणाला, “पाचवी विकेट माझी सर्वात आवडती ठरली असती, जी मला आज मिळाली नाही; त्यामुळे मी अजूनही त्या पाचव्या विकेटच्या शोधात आहे.”





