Chakan : खेडच्या विकासात राजगुरूनगर बँकेचा मोठा वाटा
Chakan : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या, शेतकरी हा अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदू आहे. शेतकरी टिकला तरच ग्रामीण अर्थव्यवस्था टिकेल. त्यामुळे शेतकर्यांना आर्थिक मदत आणि योग्य मार्गदर्शन करण्यासाठी सहकार क्षेत्राने पुढाकार घ्यावा.

चाकण : खेड तालुका औद्योगिक, शैक्षणिक आणि कृषी क्षेत्रांत प्रगती करत आहे. तालुक्याच्या विकासासाठी दिवंगत अजित पवार यांनी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला. राजगुरुनगर सहकारी बँकेने सर्वसामान्य नागरिक, शेतकरी आणि उद्योजकांना आर्थिक आधार दिला असून, बँकेची शंभर वर्षांच्या वाटचालीकडे सुरू असलेली प्रगती अभिमानास्पद आहे, असे गौरवाद्गार उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी काढले.
राजगुरुनगर सहकारी बँकेच्या चाकण-शिक्रापूर रोडवरील 20 व्या शाखेचे उद्घाटन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. कार्यक्रमाला आमदार बाबाजी काळे, माजी आमदार दिलीप मोहिते पाटील, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र कोरेकर, पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष अरुण चांभारे, बँकेचे अध्यक्ष अरुण थिगळे, उपाध्यक्ष सचिन मांजरे, सभापती गौरी मुर्हे, चाकणच्या नगराध्यक्षा मनिषा गोरे, उपनगराध्यक्ष जयश्री नायकवाडी, गटनेते नितीन गोरे, उपसभापती दिलीप डुबे, रणजित गाडे, जिल्हा परिषद सदस्य गणेश बोत्रे, समीर सुपे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अंकुश राक्षे, निलेश थिगळे, विनोद टोपे, कैलास लिंभोरे, जयसिंग दरेकर उपस्थित होते. यांसह बँकेचे संचालक किरण आहेर, राजेंद्र सांडभोर, गणेश थिगळे, विजया शिंदे, राजेंद्र वाळुंज, राहुल तांबे, दिनेश ओसवाल, सागर पाटोळे, विनायक घुमटकर, दत्तात्रय भेगडे, अविनाश कहाणे, अश्विनी पाचरणे, रामदास धनवटे, समीर आहेर, विजय डोळस, धर्मेंद्र खांडरे, गौतम कोतवाल, अमृत टाकळकर, दीपक वारुळे, अॅड. सुरेश कौदरे, महेश शेवकरी, अशोक भुजबळ, साहेबराव कड, प्रकाश भुजबळ आणि महेंद्र मेदनकर यांच्यासह पदाधिकारी, सभासद, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या, शेतकरी हा अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदू आहे. शेतकरी टिकला तरच ग्रामीण अर्थव्यवस्था टिकेल. त्यामुळे शेतकर्यांना आर्थिक मदत आणि योग्य मार्गदर्शन करण्यासाठी सहकार क्षेत्राने पुढाकार घ्यावा. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेंतर्गत राज्य सरकारने शेतकर्यांची कर्जमाफी केल्याचाही उल्लेख त्यांनी केला. खेड तालुक्यातील प्रलंबित विकासकामांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याबाबत सकारात्मक भूमिका घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी बँकेच्या प्रगतीचा आढावा घेतला. राजगुरुनगर सहकारी बँक पुणे जिल्ह्यातील अग्रेसर बँक असून, तालुक्यातील लहान-मोठ्या उद्योगांना आर्थिक सहाय्य करण्याचे काम ती करत आहे. बँकेचे सुमारे 42 हजार सभासद असून, त्यांच्या विश्वासावर बँकेची वाटचाल सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. अध्यक्ष अरुण थिगळे यांनी चाकणमध्ये दुसरी शाखा सुरू करण्याचा संकल्प केला होता. तो आज पूर्ण होत असल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला.
वाहतूक कोंडी आणि राजगुरू स्मारकाचा प्रश्न
आमदार बाबाजी काळे यांनी बँकेच्या कार्यपद्धतीचे कौतुक करताना 42 हजार सभासदांचा विश्वास संपादन केल्याचे नमूद केले. बँकेला तांत्रिक अडचणी आल्यास स्वर्गीय अजित पवार यांच्या माध्यमातून त्या सोडविण्यासाठी प्रयत्न होत असल्याची आठवण त्यांनी सांगितली. पालकमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांनी खेड तालुक्यातील प्रश्न सोडविण्यासाठी सहकार्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. चाकणमधील वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर असून, त्यावर ठोस उपाययोजना कराव्यात. तसेच हुतात्मा राजगुरू स्मारकाचे अपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी काळे यांनी केली.
राजगुरुनगर सहकारी बँकेच्या नव्या शाखेमुळे चाकण-शिक्रापूर रोड परिसरातील नागरिक, व्यापारी, उद्योजक आणि शेतकर्यांना बँकिंग सेवा अधिक सुलभ होणार आहेत. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमृत टाकळकर यांनी केले. अध्यक्ष अरुण थिगळे आणि नितीन गोरे यांनी मनोगत व्यक्त केले. पूजा थिगळे यांनी सूत्रसंचालन केले, तर उपाध्यक्ष सचिन मांजरे यांनी आभार मानले.





