Rajat Patidar : ‘मला आरसीबीसाठी खेळायचे नव्हते…’, रजत पाटीदारचा धक्कादायक खुलासा; काय आहे कारण?

रजत पाटीदारचा आरसीबीबद्दल मोठा खुलासा –
आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदारने एक एसा खुलासा केला आहे, ज्यामुळे खळबळ उडाली आहे. त्याने सांगितले की, २०२२ मध्ये आरसीबीने त्याला लिलावात सहभागी करून घेण्याचे आश्वासन देऊनही त्याला सहभागी करून घेतले नव्हते. त्यानंतर तो खूप दुःखी झाला होता आणि आरसीबीसाठी कधीच खेळायचे नाही, असे ठरवले होते. यानंतर आरसीबीने लवनीथ सिसोदियाच्या जागी त्याला संघात सामील केले होते.
मेगा लिलावात मला दुर्लक्षित करण्यात आले – रजत पाटीदार
𝗛𝗼𝘄 𝗱𝗶𝗱 𝗥𝗮𝗷𝗮𝘁 𝗣𝗮𝘁𝗶𝗱𝗮𝗿 𝗯𝗲𝗰𝗼𝗺𝗲 𝗮 𝘀𝗽𝗶𝗻 𝗯𝗮𝘀𝗵𝗲𝗿? 🥵
Find out about that and more, on @bigbasket_com presents RCB Podcast Bold and Beyond. Full episode is up on our YouTube channel, listen to it now… 🎙️#PlayBold #ನಮ್ಮRCB #IPL2025 pic.twitter.com/7l3GdgVgIc
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) May 16, 2025
रजत पाटीदारने ‘आरसीबी पॉडकास्ट’मध्ये सांगितले की, “मला आयपीएल २०२२ च्या मेगा लिलावापूर्वी एक संदेश मिळाला होती की तुम्ही तयार राहा. आम्ही तुम्हाला निवडू. त्यामुळे मला थोडी आशा होती की आरसीबीकडून खेळण्याची आणखी एक संधी मिळेल. पण मेगा लिलावात मला दुर्लक्षित करण्यात आले. ज्यामुळे मला त्याबद्दल थोडे दुःख झाले होते.” पण, मध्य प्रदेशातील एका खेळाडूला दुखापत झाल्यानंतर, मध्य प्रदेशच्या या ३१ वर्षीय फलंदाजाला आरसीबीमध्ये परतण्याची संधी मिळाली. मात्र, पाटीदार आरसीबीसाठी परतण्यास उत्सुक नव्हता.
हेही वाचा – Mitchell Starc : मिचेल स्टार्कला दिल्लीची साथ सोडणं पडलं महागात! इतक्या कोटींवर सोडावं लागणार पाणी
लवनीथ सिसोदियाच्या जागी मिळाली संधी –
कारण त्याला माहित होते की त्याला मोठ्या खेळाडूंनी भरलेल्या संघात खेळण्याची संधी मिळणार नाही. रजत पुढे म्हणाला, “लिलावात निवड न झाल्यानंतर मी स्थानिक क्रिकेटमध्ये इंदूरसाठी खेळायला सुरुवात केली त्यानंतर मला एक फोन आला की, ‘आम्ही लवनीथ सिसोदियाच्या जागी तुम्हाला निवडत आहोत’. यानंतर खरे सांगायचे तर, मला कोणत्याही खेळाडूचा पर्याय म्हणून यायचे नव्हते. कारण मला वाटले की मला तिथे खेळण्याची संधी मिळणार नाही.
हेही वाचा – Ravi Shastri : ‘विराटचे मन पूर्णपणे साफ होते, पण…’, कोहलीच्या निवृत्तीबद्दल रवी शास्त्रींचा मोठा खुलासा
आरसीबीचा कर्णधार पुढे म्हणाला, मला नेहमीच असं वाटतं की मला तिथे डगआउटमध्ये बसायचं नाहीये. यानंतर काही काळानंतर माझा राग गेल्यानंतर मी मान्य झालो. कोहलीसारख्या दिग्गजाकडून कर्णधारपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर त्याला बाव जाणवत होता, असे पाटीदार म्हणाला.परंतु या स्टार फलंदाजाच्या प्रोत्साहनदायक शब्दांनी त्याचा आत्मविश्वास वाढवला.





