Nuwan Thushara Fitness : IPL 2026 पूर्वी आरसीबीला मोठा धक्का! दुखापत नाही तरीही ‘हा’ गोलंदाज आयपीएलमधून बाहेर, नेमकं कारण काय?
Nuwan Thushara Fitness : संघातील गोलंदाजीची फळी एकामागून एक धक्के सहन करत असून, आता श्रीलंकेच्या एका स्टार गोलंदाजाचा पत्ता कट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

RCB Pacer Nuwan Thushara is set to miss IPL 2026 : आयपीएल २०२६ सुरू होण्यासाठी अवघे काही दिवस उरले असताना आरसीबी संघाला मोठा धक्का बसला आहे. ज्यामुळे आरसीबी संघ व्यवस्थापनाची चिंता वाढली आहे. श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज नुवान तुषाराला श्रीलंका क्रिकेट बोर्डाने (SLC) आयपीएलमध्ये खेळण्यासाठी आवश्यक असलेले ना हरकत प्रमाणपत्र (NOC) देण्यास नकार दिला आहे. बोर्डाच्या कडक फिटनेस नियमावलीचा फटका तुषाराला बसला असून, यामुळे आरसीबीच्या गोलंदाजीचे नियोजन कोलमडण्याची भीती आहे.
फिटनेस चाचणीत तुषारा ‘फेल’ –
न्यूजवायरच्या रिपोर्टनुसार, श्रीलंका क्रिकेट बोर्डाने परदेशी लीगमध्ये खेळण्यासाठी खेळाडूंना कडक शारीरिक चाचण्या (Physical Performance Test) उत्तीर्ण करणे अनिवार्य केले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, नुवान तुषाराला कोणतीही दुखापत नसतानाही तो बोर्डाने ठरवून दिलेल्या फिटनेस मानकांवर खरा उतरू शकला नाही. या चाचणीत अपयशी ठरल्यामुळे त्याला आयपीएलसाठी क्लिअरन्स मिळालेला नाही. जर बोर्डाने आपला निर्णय बदलला नाही, तर तुषाराचा आरसीबीसोबतचा १.६ कोटी रुपयांचा करार रद्द होऊ शकतो.
आरसीबीच्या गोलंदाजीवर संकटाचे सावट –
🚨 𝑹𝑬𝑷𝑶𝑹𝑻𝑺 🚨
Nuwan Thushara is likely to miss IPL 2026 for RCB, as Sri Lanka Cricket has refused to grant him an NOC following a new strict fitness policy. ❌👀
(Source: NewsWire)#RCB #IPL2026 #NuwanThushara #Sportskeeda pic.twitter.com/sHcX4hnFbq
— Sportskeeda (@Sportskeeda) March 26, 2026
आरसीबीसाठी हा दुसरा मोठा धक्का आहे, कारण याआधीच भारतीय वेगवान गोलंदाज यश दयाल आयपीएल २०२६ मधून बाहेर झाला आहे. एकापाठोपाठ एक मुख्य गोलंदाज बाहेर पडत असल्याने कर्णधार रजत पाटीदार आणि विराट कोहली यांच्यासमोर नवा पेच निर्माण झाला आहे. तुषाराने २०२५ च्या आशिया चषक स्पर्धेत चमकदार कामगिरी केली होती, मात्र फिटनेसमुळे त्याला टी-२० विश्वचषकातही स्थान मिळाले नव्हते. आता आयपीएलमधून बाहेर पडणे हे त्याच्या करिअरसाठी मोठे नुकसान मानले जात आहे.
इतर लंकन खेळाडूंना हिरवा कंदील –
एकीकडे तुषाराला रोखण्यात आले असले तरी, श्रीलंकेच्या इतर खेळाडूंनी ही चाचणी यशस्वीरित्या पार केली आहे. दुष्मंथा चमीरा, दासुन शनाका, पथुम निसांका आणि कामिंदु मेंडिस या खेळाडूंना आयपीएलमध्ये खेळण्याची परवानगी मिळाली आहे.





