Mitchell Starc : मिचेल स्टार्कला दिल्लीची साथ सोडणं पडलं महागात! इतक्या कोटींवर सोडावं लागणार पाणी

How much will Mitchell Starc salary be cut in IPL 2025 : ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने आयपीएल २०२५ मधून अधिकृतपणे माघार घेतली आहे. स्टार्कला ११.७५ कोटी रुपये खर्च करून दिल्ली कॅपिटल्स संघात समाविष्ट करण्यात आले होते, परंतु स्पर्धा सुमारे एका १० दिवस पुढे ढकलण्यात आल्यानंतर स्टार्कने भारतात परतण्यास नकार दिला आहे. स्टार्क परत न येण्याचे कारण वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल असल्याचे सांगितले जात आहे. अशात त्याच्या मानधनात कपात केली जाणार का? जाणून घेऊया.
मिचेल स्टार्कचे मानधन कपात होणार का?
खरं तर, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील डब्ल्यूटीसीचा फायनल सामना पुढील महिन्यात ११ जूनपासून ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर खेळला जाणार आहे. त्याने आयपीएलपेक्षा देशासाठी खेळण्याला प्राधान्य दिले आहे. आता प्रश्न असा आहे की, हंगामाच्या मध्यात दिल्ली कॅपिटल्सची साथ सोडल्यामुळे मिचेल स्टार्कच्या मानधनावर परिणाम होईल का? तर उत्तर हो आहे.
Mitchell Starc! pic.twitter.com/wm6VXeTxh5
— RVCJ Media (@RVCJ_FB) May 16, 2025
मिचेल स्टार्कचे मानधन किती कपात होणार?
क्रिकेट डॉट कॉम एयूच्या माहितीनुसार, जर दिल्ली संघ चालू हंगामात अंतिम फेरीत पोहोचला तर स्टार्कला त्याच्या आयपीएल २०२५ च्या मानधनाचा एक तृतीयांश भाग द्यावा लागेल. याचा अर्थ असा की जर डावखुरा वेगवान गोलंदाज आयपीएल मध्येच सोडले, तर त्याला ३.९२ कोटी रुपयांवर पाणी सोडावं लागेल. जर असे झाले तर स्टार्कला आयपीएल मानधन म्हणून फक्त ७.८३ कोटी रुपये मिळतील.
हेही वाचा – Ravi Shastri : ‘विराटचे मन पूर्णपणे साफ होते, पण…’, कोहलीच्या निवृत्तीबद्दल रवी शास्त्रींचा मोठा खुलासा
मिचेल स्टार्कने दिल्ली कॅपिटल्ससाठी बजावली महत्त्वाची भूमिका –
ONCE A KNIGHT, ALWAYS A KNIGHT 💜
Mitchell Starc decided to pull out from the remaining matches of IPL2025 to clear KKR way to the playoffs!
Thank You Mr. Starc 🙏pic.twitter.com/71IzabJs1o
— RI5HU SRIVASTAVA 🇮🇳 (@rishuknight15) May 16, 2025
मिचेल स्टार्कने आयपीएल २०२५ मध्ये दिल्ली कॅपिटल्ससाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्याने आतापर्यंत खेळलेल्या ११ सामन्यांमध्ये १४ विकेट्स घेतल्या आहेत. जर संघ प्लेऑफमध्ये पोहोचला तर संघाला स्टार्कची उणीव नक्कीच जाणवेल. तो बाद प्लेऑफमध्ये संघासाठी महत्त्वाची भूमिका बजावू शकला असता. कारण त्याने गेल्या वर्षी केकेआरसाठी हे करुन दाखवले होते.





