ENG W vs SA W South Africa Shameful record : आयसीसी महिला वनडे विश्वचषक 2025 मधील चौथा सामना गुवाहाटीच्या बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात इंग्लडने दक्षिण आफ्रिकेचा अवघ्या 14.1 षटकांत 10 विकेट्सनी दारुण पराभव करत इतिहास रचला. टॉस हरल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी उतरलेला दक्षिण आफ्रिका संघ 20.4 षटकांत केवळ 69 धावांवर गारद झाला. हा दक्षिण आफ्रिका महिला संघाचा वनडे विश्वचषकाच्या इतिहासातील दुसरा सर्वात कमी धावसंख्येचा डाव ठरला आहे. या सामन्यात केवळ सिनालो जाफता ही एकमेव खेळाडू दहा धावांचा टप्पा ओलांडू शकली. 20 वर्षांनंतर प्रथमच घडले असे – दक्षिण आफ्रिका महिला संघाच्या या सामन्यातील फलंदाजी अत्यंत खराब ठरली. त्यांच्या पहिल्या पाच फलंदाजांना दहा धावांचा आकडा गाठण्यातही यश आले नाही. महिला वनडे विश्वचषकाच्या गेल्या 20 वर्षांच्या इतिहासात प्रथमच अशी घटना घडली आहे, जिथे एखाद्या संघाच्या पहिल्या पाच फलंदाजांना दहा धावांचा टप्पा गाठता आला नाही. यापूर्वी 2005 मध्ये आफ्रिकेने इंग्लंडविरुद्ध खेळताना श्रीलंका महिला संघ 70 धावांवर सर्वबाद झाला होता, तेव्हा त्यांच्या पहिल्या पाच फलंदाजांनाही दहा धावांचा आकडा पार करता आला नव्हता. विश्वचषकात सर्वात कमी षटकांत सर्वबाद होणारा दुसरा संघ – इंग्लंडविरुद्धच्या या सामन्यात दक्षिण आफ्रिका महिला संघाचा डाव अवघ्या 20.4 षटकांत आटोपला. महिला वनडे विश्वचषकाच्या इतिहासात सर्वात कमी षटकांत सर्वबाद होण्याच्या यादीत दक्षिण आफ्रिका दुसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीत पहिला क्रमांक पाकिस्तान महिला संघाचा आहे, जो 1997 मध्ये हैदराबाद येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना केवळ 13.4 षटकांत सर्वबाद झाला होता. हेही वाचा – IND vs WI : राहुल, जुरेल आणि जडेजाचे वेस्ट इंडिजविरुद्ध धमाकेदार शतक, १८ वर्षांनंतर घडला असा पराक्रम महिला वनडे विश्वचषकात सर्वात कमी षटकांत सर्वबाद होणारे संघ: 1. पाकिस्तान – 13.4 षटके वि. ऑस्ट्रेलिया (हैदराबाद, 1997) 2. दक्षिण आफ्रिका – 20.4 षटके वि. इंग्लंड (गुवाहाटी, 2025) 3. दक्षिण आफ्रिका – 22.1 षटके वि. न्यूझीलंड (बाउरल, 2009) 4. नेदरलँड्स – 25.1 षटके वि. ऑस्ट्रेलिया (पर्थ, 1988)