Raj Thackeray : “हा निकाल आम्हाला मान्य नाही…”; मनसेचा सुद्धा इव्हीएमवर संशय

Raj Thackeray – महायुतीला मिळालेल्या यशासाठी महाविकास आघाडीने ईव्हीएमवर संशय व्यक्त केला होता. आता मनसेकडून देखील ईव्हीएमवर संशय व्यक्त करण्यात आला आहे. मनसे नेते अविनाश जाधव यांनी ईव्हीएमने घात केला, असे म्हणताना निवडणुकीच्या निकालावर नाराजी व्यक्त केली.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने १२५ पेक्षा अधिक जागांवर उमेदवार उभे करण्यात आले होते. या निवडणुकीत महायुतीने २३० तर महाविकास आघाडीने ४९ जागांवर विजय मिळवला. मात्र मनसेला एकही जागा जिंकता आली नाही.
त्यातच माहीम मतदार संघातून अमित ठाकरे व २०१९ ला जिंकून येणारे राजू पाटील यांना देखील पराभव स्वीकारावा लागला. त्यातच काल राष्ट्रवादी (शरद पवार) व शिवसेना (उद्धव ठाकरे) यांच्या बैठकीमध्ये पराभूत उमेदवारांनी ईव्हीएमवर संशय व्यक्त केला. त्यानंतर प्रथमच मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी पराभवासाठी ईव्हीएमला जबाबादार ठरवले.
मागील काही दिवसांपासून निकाल कसा मॅनेज केला, याचे अनेक व्हिडियोज येत आहेत. हा निकाल आम्हाला मान्य नाही. गेली दहा वर्षे जे उमेदवार आमदार नव्हते, ते देखील १ लाखापेक्षा जास्त मातांनी विजयी झाले आहेत. त्यामुळे असे निकाल लावणे ईव्हीएमशिवाय शक्य नाही. ईव्हीएमनेच घात केल्याने अनेक पक्षांना उतरती कळा लागली असल्याचा आरोप अविनाश जाधव यांनी केला.
विरोधी पक्ष एकत्र आला तरीही….
भाजपला या निवडणुकीत १३२ जागांवर विजय मिळविताना बहुमताच्या अगदीच जवळ गेला आहे. एवढा मोठा विजय मिळवून देखील भाजपमध्ये आनंद व्यक्त करण्यात येत नाही. ईव्हीएम विरोधात विरोधी पक्ष कितीही एकत्र आला, तरी काहीच उपयोग होत नाही.
त्यामुळे देशात काहीतरी चुकीचे चालले आहे, जे आता सर्वाना कळले पाहिले, असे म्हणत, जाधव यांनी अमेरिकेसारख्या देशात बॅलेटपेपरवर निवडणुका होतात, तर ईव्हीएम इथे हवीच कशाला असा सवाल देखील उपस्थित केला.





