Raj Thackeray : गुन्ह्याशी माझा संबंध नाही; रेल्वे भरती आंदोलन प्रकरणी राज ठाकरे ठाणे न्यायालयात हजर
Raj Thackeray : २००८ च्या रेल्वे भरती आंदोलन प्रकरणी राज ठाकरे यांनी ठाणे न्यायालयात आपला जबाब नोंदवला आहे.

Raj Thackeray : 2008 साली घेण्यात आलेल्या रेल्वे भरतीवेळी मनसेच्यावतीने करण्यात आलेल्या आंदोलन प्रकरणाच्या सुनावणीसाठी मनसेप्रमुख राज ठाकरे हे ठाणे न्यायालयात हजर झाले होते. ठाकरेंसह या प्रकरणातील इतर सहा जण सुद्धा कोर्टात हजर होते. (Raj Thackeray)
न्यायालयात ठाकरेंचाही जबाब नोंदवण्यात आला असून, माझा या गुन्ह्याशी काहीही संबंध नाही, असे त्यांनी कोर्टात म्हटले. आंदोलनावेळी ते नाशिकला होते. याप्रकरणी, न्यायालयाने पुढची तारीख 18 मे रोजीची दिली असून राज ठाकरेंना हजर राहण्याची गरज नसल्याचेही त्यांच्या वकिलांकडून सांगण्यात आले.
2008 साली रेल्वे भरतीदरम्यान कल्याण स्थानकावर उत्तर भारतीय उमेदवारांना मनसे कार्यकर्त्यांनी मारहाण करत रेल्वेचे देखील मोठे नुकसान केले होते. मराठी तरुणांच्या नोकऱ्या परप्रांतीयांनी हिरावल्या असा आरोप करत, राज ठाकरे यांनी आणि मनसे कार्यकर्त्यांनी परप्रांतीयांना या आंदोलनात लक्ष्य केले होते. (Raj Thackeray)
या हल्ल्याप्रकरणी राज ठाकरे यांच्यासह सात जणांवर गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी, न्यायालयात आज सुनावणी झाली आहे. ठाकरेंना सोडून इतर कार्यकर्त्यांवर जे आरोप आहेत त्याबद्दल न्यायधीशांकडून जबाब वाचून दाखवण्यात आले.
दरम्यान, याप्रकरणाची याआधीची सुनावणी डिसेंबर महिन्यात झाली होती, ज्यामध्ये आपल्याला गुन्हा कबूल नाही, असे ठाकरे यांनी कोर्टात म्हटले होते. (Raj Thackeray)
हेही वाचा





