Raj Thackeray: “…तर खिशात ५० ग्रॅम पावडर टाकून गुन्हा दाखल करू”; राज ठाकरेंनी ‘त्या’ व्हिडिओवर संताप व्यक्त करताच, पोलिसावर कारवाई…
Raj Thackeray: या संपूर्ण प्रकाराचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मुंबई पोलीस दलात आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

Raj Thackeray: नीट पेपरफुटी प्रकरणावरून दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान, विद्यार्थांवर लाठीचार्ज करण्यात आला. याप्रकरणी देशभरातून संताप व्यक्त करण्यात आला. या आंदोलनाची झळ महाराष्ट्रातही पोहोचली असून, मुंबईत पार पडलेल्या एका आंदोलनादरम्यान मुंबई पोलिसांनी विद्यार्थ्यांना थेट ड्रग्ज प्रकरणात अडकवण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात येत आहे.
या आंदोलनादरम्यान ताब्यात घेतलेल्या विद्यार्थ्यांना मुंबई पोलिसांच्या गाडीतच अंमली पदार्थांच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिल्याचा एक अत्यंत धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. (Raj Thackeray)
देशभरात गाजत असलेल्या नीट पेपरफुटी प्रकरणावरून विद्यार्थ्यांचा आणि विरोधकांचा संताप दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. या आंदोलनाची झळ महाराष्ट्रातही पोहोचली असून, मुंबईत पार पडलेल्या एका आंदोलनादरम्यान मुंबई पोलिसांनी विद्यार्थ्यांना थेट ड्रग्ज प्रकरणात अडकवण्याची धमकी दिल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात येत आहे. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मुंबई पोलीस दलात आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
नेमकं काय घडलं? (Raj Thackeray)
नीट पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना ताब्यात घेतल्यानंतर पोलीस गाडीत नेले जात असतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला. यामध्ये गाडीतील एक पोलीस कर्मचारी विद्यार्थ्यांना धमकी देताना ऐकू येत आहे. “पुन्हा या आंदोलनात दिसाल, तर खिशात ५० ग्रॅम पावडर (ड्रग्ज) टाकून गुन्हा दाखल करू! तुमचं आयुष्य वाया जाईल आणि जामीनही मिळणार नाही. तुमच्यामुळे आम्हाला त्रास होतोय,” अशा शब्दांत पोलीस कर्मचाऱ्याने आंदोलक विद्यार्थ्यांना धमकावल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या व्हिडीओवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन संताप व्यक्त केला. “महाराष्ट्रातील पोलीस सामान्यत: विद्यार्थ्यांना सहकार्य करतात. परंतु, माझ्याकडे आलेला हा धक्कादायक व्हिडीओ मी थेट मुंबई पोलीस आयुक्तांना पाठवला आहे. पोलीस जर विद्यार्थ्यांना खिशात पावडर टाकेन अशी धमकी देत असतील, तर पोलिसांकडे आता ही पावडर मिळायला लागली आहे का? तो पोलीस कर्मचारी ड्रग्ज सप्लायर आहे का?” अशा शब्दांत राज ठाकरेंनी पोलिसांच्या या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
मुंबईत आपल्या न्याय्य मागण्यांसाठी आणि हक्कांसाठी शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणाऱ्या तरुण विद्यार्थ्यांवर पोलीस बळाचा वापर केला जात आहे. लाठीहल्ल्यानंतर आता या विद्यार्थ्यांना थेट खोट्या गुन्ह्यांत अडकवण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. सोशल मीडियावर समोर आलेल्या एका अत्यंत… pic.twitter.com/QIfpdJ5MPd
— Supriya Sule (@supriya_sule) July 23, 2026
मुंबई पोलिसांचे स्पष्टीकरण (Raj Thackeray)
दरम्यान, विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांची धमकी देऊन कारवाई करण्याची भिती घालणारा तो काॅन्स्टेबल मुंबई पोलिसांच्या सायन पोलिस पोलिस ठाण्यात कार्यरत आहे. तो व्हिडिओ बुधवारचा असून त्या चालकाची तात्काळ बदली करण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीचे आदेश वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिले आहेत. चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित कर्मचाऱ्याला त्याच्या सध्याच्या पदावरून हटवण्यात आले आहे. तपासणी करून दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असे मुंबई पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. (Raj Thackeray)
दरम्यान, सुप्रिया सुळे यांनीही हा व्हिडिओ शेअर करत, हे कृत्य अतिशय विकृत, तितकेच निषेधार्ह आणि खाकी वर्दीला काळीमा फासणारे आहे. ज्या मुंबई पोलिसांवर अंमली पदार्थांचा व्यापार मुळापासून उखडण्याची नैतिक व कायदेशीर जबाबदारी आहे, तेच पोलीस विद्यार्थ्यांना धमकावण्यासाठी ड्रग्जचा वापर करण्याची भाषा करत असतील, तर हे अत्यंत गंभीर असल्याचे म्हंटले आहे. तसेच काही प्रश्न उपस्थित केले आहे. (Raj Thackeray)
हेही वाचा:





