Raj Thackeray : भीमाशंकरमधील झाडांच्या कत्तलींची राज ठाकरे करणार पाहणी; नागरिकांनी शिवतीर्थावर घेतली भेट
राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलेली पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्योगपती गौतम अदाणी यांच्यावरील डॉक्युमेंट्री पोस्ट डिलीट करण्याचा निर्णय घेतला आहे.

Raj Thackeray – रायगडच्या कर्जत तालुक्यातील कर्जत-भीमाशंकर जंगल परिसरात टोरेंट जलविद्युत प्रकल्पासाठी हजारो झाडांची कत्तल सुरु आहे. त्यामुळे येत्या 27 तारखेला कर्जतमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची सभा होईल. त्या सभेमध्ये पुढच्या आंदोलनासंदर्भातील दिशा ठरवली जाईल, अशी प्रतिक्रिया मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दिली.
आता मनसेही कर्जत, भीभाशंकरमधील झाडांच्या कत्तलींच्या विरोधात मैदानात उतरली असून आता या जलविद्युत ऊर्जा साठवण प्रकल्पाला विरोध दर्शवला आहे. ग्रामपंचायतचा ठराव न घेता, स्थानिकांना विश्वासात न घेता, ठराव मंजूर झालेले नसताना आणि आदिवासी बांधव, स्थानिकांचे पुढे काय?
याबाबत कुठलीही माहिती न देता स्थानिकांचा विरोध डावलून वृक्षतोड सुरु केली असल्याचे म्हटले आहे. सरकार उद्योगपतींच्या घशात जमिनी घालायला निर्माण करताय का? नाशिकमध्ये कुंभमेळा दरम्यान पण तेच झाले. वनमंत्री गणेश नाईक याबाबत एक शब्दही बोलत नाही. असेही देशपांडे म्हणाले.
मुंबई पोलिसांनी विनंती करायची गरज काय ?
राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलेली पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्योगपती गौतम अदाणी यांच्यावरील डॉक्युमेंट्री पोस्ट डिलीट करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई पोलीस आयुक्तांनी केलेल्या विनंतीचा मान राखून आपण ही पोस्ट हटवत असल्याचे ठाकरे यांनी स्पष्ट केले.
यावरही संदीप देशपांडे यांनी भाष्य करत सरकारवर टीका केली. मुंबई पोलिसांना अशी विनंती करायची गरज का लागली? कोणाचा दबाव होता? ते त्यांचे काम आहे का? बिष्णोईचे गुंड येतात, हल्ला करतात तर हे बघायला पोलिसांना वेळ आहे का? ही लोकशाही असेल तर पोलिसांच हे काम आहे का?, असा हल्लाबोल त्यांनी केला.





