Surya Jyotika : लग्न करेन तर ज्योतिकाशी…नाहीतर आयुष्यभर अविवाहित राहीन! सूर्या यांच्या निर्णयाने बदलला वडिलांचा निर्णय
Surya Jyotika सूर्या आणि ज्योतिकाची पहिली भेट १९९९ मध्ये ‘पूवेल्लम केट्टुप्पर’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान झाली. त्यावेळी दोघेही करिअरच्या सुरुवातीच्या टप्प्यात होते. सुरुवातीला त्यांच्यात मैत्री झाली आणि एकमेकांसोबत वेळ घालवत असताना ही मैत्री हळूहळू प्रेमात बदलली.

Surya Jyotika: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता सूर्या आणि अभिनेत्री ज्योतिका यांची जोडी चाहत्यांची कायमच आवडती राहिली आहे. पडद्यावरील त्यांची केमिस्ट्री जितकी गाजली, तितकीच त्यांच्या खऱ्या आयुष्यातील प्रेमकथाही प्रेरणादायी मानली जाते. आज त्यांच्या लग्नाला जवळपास दोन दशके पूर्ण झाली असली, तरी त्यांचे नाते आजही तितकेच मजबूत आणि प्रेमळ आहे. मात्र, हे नाते जुळवण्यासाठी दोघांनाही अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता.
सूर्या आणि ज्योतिकाची पहिली भेट १९९९ मध्ये ‘पूवेल्लम केट्टुप्पर’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान झाली. त्यावेळी दोघेही करिअरच्या सुरुवातीच्या टप्प्यात होते. सुरुवातीला त्यांच्यात मैत्री झाली आणि एकमेकांसोबत वेळ घालवत असताना ही मैत्री हळूहळू प्रेमात बदलली. जवळपास सात वर्षे एकमेकांना समजून घेतल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि ११ सप्टेंबर २००६ रोजी विवाहबंधनात अडकले. (Surya Jyotika)
मात्र, त्यांच्या या नात्याला सुरुवातीला सूर्या यांच्या कुटुंबाचा, विशेषतः वडील आणि ज्येष्ठ अभिनेते शिवकुमार यांचा विरोध होता. त्यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, सुरुवातीला त्यांना हे लग्न मान्य नव्हते. त्यामुळे सूर्या आणि ज्योतिकाला आपल्या नात्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला. (Surya Jyotika)
या काळात सूर्या आपल्या निर्णयावर ठाम राहिले. त्यांनी स्पष्टपणे सांगितले होते की, जर त्यांचे लग्न ज्योतिकाशी झाले नाही, तर ते आयुष्यभर लग्न करणार नाहीत. मुलाचा हा ठाम निर्धार पाहून अखेर शिवकुमार यांचे मत बदलले. आपल्या चित्रपटांमधून नेहमी प्रेमाचा विजय दाखवणारा मी, स्वतःच्या मुलाच्या प्रेमाला विरोध कसा करू, असा विचार त्यांच्या मनात आला आणि त्यांनी या नात्याला अखेर संमती दिली. (Surya Jyotika)

Suriya-Jyotika
सूर्या यांनी अनेक मुलाखतींमध्ये ज्योतिकाच्या मेहनतीचे आणि कामाप्रती असलेल्या समर्पणाचे कौतुक केले आहे. त्यांनी सांगितले की, अभिनयाच्या सुरुवातीच्या काळात त्यांना संवाद बोलताना संकोच वाटायचा. तर दुसरीकडे, हिंदी भाषिक पार्श्वभूमी असलेल्या ज्योतिका तमिळ भाषा नवीन असूनही प्रत्येक संवाद अचूक पाठ करून सेटवर यायच्या. त्यांच्या मेहनतीने आणि शिस्तबद्ध स्वभावाने सूर्या खूप प्रभावित झाले होते. (Surya Jyotika)
दोघांच्या नात्याचा सर्वात मजबूत पाया म्हणजे एकमेकांबद्दलचा आदर. प्रेमासोबतच परस्परांचा सन्मान आणि विश्वास यामुळे त्यांचे वैवाहिक आयुष्य आजही आनंदी आणि यशस्वी मानले जाते.
लग्नाच्या वेळी ज्योतिका करिअरच्या सर्वोच्च टप्प्यावर होत्या. तरीही त्यांनी वयाच्या अवघ्या २८व्या वर्षी अभिनयातून काही काळ ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला. अनेकांनी हा निर्णय कौटुंबिक दबावामुळे घेतल्याचा अंदाज व्यक्त केला होता. मात्र, ज्योतिकाने नंतर स्पष्ट केले की, हा निर्णय पूर्णपणे तिचा स्वतःचा होता. मुलांचे संगोपन आणि कुटुंबाला वेळ देण्यासाठी तिने हा निर्णय घेतला होता.
काही वर्षांनंतर, वयाच्या ३५व्या वर्षी ज्योतिकाने पुन्हा चित्रपटसृष्टीत दमदार पुनरागमन केले. आजही सूर्या आणि ज्योतिका हे दोघे यशस्वी कलाकार असले, तरी घरी परतल्यानंतर ते स्टार नसून आपल्या मुलांचे आई-वडील म्हणूनच आयुष्य जगतात. त्यांच्या साधेपणामुळे आणि एकमेकांवरील प्रेमामुळे ही जोडी आजही चाहत्यांसाठी आदर्श मानली जाते.





