“राज ठाकरे कुचक्या कानाचे, फडणवीस त्यांच्या घरी चहा पिऊन गेले तरी…” मनोज जरांगेंचा हल्लाबोल

Manoj Jarange Vs Raj Thackeray | मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणाला सुरूवात केली आहे. मोठ्या संख्येने मराठा आंदोलकांनी आझाद मैदानावर ठिय्या मांडला आहे. या आंदोलनावरुन मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मराठा मोर्चा आणि आरक्षणाबाबत सर्व गोष्टींची उत्तरं एकनाथ शिंदेच देऊ शकतील. मनोज जरांगे परत का आले याचंही उत्तर एकनाथ शिंदेंना जाऊन विचारा, असं वक्तव्य केलं होतं. यावरून आता मनोज जरांगे यांनी राज ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. Manoj Jarange Vs Raj Thackeray |
मनोज जरांगे काय म्हणाले?
“दोघे भाऊ चांगले, ब्रँड चांगला आहे. हा विनाकारण मराठ्यांच्यामध्ये पडत आहे. ११ ते १३ आमदार निवडून दिले. ते पळून गेले, आम्ही विचारलं का? तुम्ही नाशिकला, पुण्याला, संभाजीनगरला येता आम्ही विचारलं का? फडणवीसांनी लोकसभेला तुमचा गेम केला. विधानसभेला तुमच्या मुलाला त्यांनीच पाडलं. तरी आम्ही विचारलं का? राज ठाकरे म्हणजे मानाला भुकलेलं पोरगं आहे. फडणवीस त्यांच्या घरी चहा पिऊन गेला तरी मग पक्ष बरबाद झाला तरी चालतं. कुचक्या कानाचं म्हणतात,” असे म्हणत मनोज जरांगे यांनी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.
“काल जर मुख्यमंत्र्यांच्या घरी बैठक झाली. तातडीने मार्ग काढा असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले असं ऐकलं. मग ज्यांना आदेश दिले तर ते मार्ग का काढत नाही. उपसमितीला आदेश दिला. मग मार्ग का काढत नाही? फक्त बैठका घेत आहेत,” असेही जरांगे म्हणाले. Manoj Jarange Vs Raj Thackeray |
चंद्रकांत पाटलांच्या टीकेवर जरांगेंचे प्रत्युत्तर
दुसरीकडे, मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जरांगे पाटलांवर टीका केली. ‘राजकीय आरक्षण मिळावे यासाठीच मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत आंदोलन सुरू केलं’, असं ते म्हणाले. चंद्रकांत पाटलांच्या टीकेवर जरांगे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
…तर गेम वाजवला म्हणून समजा
‘चंद्रकांत पाटील यांना सांगा, त्यांनी चांगलं काम केलं म्हणून आम्ही चांगलं बोललो. पण आता वचवच करू नये. त्यांना काय अक्कल आहे? त्यामुळेच त्यांना काढून टाकलंय. ‘चंद्रकांत पाटलांनी शांत राहावं, मराठ्यांच्या शिव्या खाऊ नये. चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून पडताळणी रोखली होती. कोल्हापूर म्हणजे आमच्याच राजघराण्याच्या कचाट्यात ते राहतात. पाटील यांनी जास्त बोलू नये. शांत राहावे. जास्त बोलले तर, त्यांचा गेम वाजवला म्हणून समजा’, असा थेट इशारा जरांगे पाटील यांनी दिला. Manoj Jarange Vs Raj Thackeray |
हेही वाचा:
गौराईच्या आगमनासोबतच राज्यात पावसाची हजेरी; ‘या’ जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा





