गौराईच्या आगमनासोबतच राज्यात पावसाची हजेरी; ‘या’ जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

Maharashtra Weather Update | गणरायाच्या आगमनासोबत राज्यात अनेक ठिकाणी पावसाला सुरूवात झाली आहे. मुंबईसह कोकणात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. आज घरोघरी गौराईचे आगमन होणार आहे. गौराईच्या आगमनालाही वरुण राजा हजेरी लावण्याची शक्यता आहे.
मुंबई शहर आणि उपनगरात मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज आहे. सोमवारनंतर मुंबईत पुन्हा पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. मुंबईबरोबरच मराठवाडा व विदर्भ प्रदेशातील काही भागांत हलका ते मध्यम पाऊस बरसण्याची शक्यता आहे.
या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
आज पालघर, रायगड, सिंधुदुर्ग, पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा, अकोला, अमरावती, गडचिरोली जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. तर छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बुलढाणा, वाशीम, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया जिल्ह्यात विजांसह पावसाचा अंदाज असल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
तर उर्वरित राज्यात हलक्या पावसाची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला असून या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. Maharashtra Weather Update |
हेही वाचा :





