“सकाळी ४ वाजता उठा, ३६ सेकंदात दोन मतं डिलीट करा अन्…” राहुल गांधींचा पुन्हा निवडणूक आयोगावर मत चोरीचा आरोप

Rahul Gandhi on Election Commission। काँग्रेस नेते राहुल गांधी हे मतचोरीच्या मुद्द्यावरून मोदी सरकार आणि निवडणूक आयोगावर सतत हल्ला करत आहेत. लोकसभेतील विरोधी पक्षनेते यांनी कालपत्रकार परिषदेत अनेक गंभीर आरोप केले. त्यानंतर आज त्यांनी एक प्रेझेंटेशन शेअर करत नवीन प्रश्न उपस्थित केले.
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करून सरकार आणि निवडणूक आयोगाला पुन्हा एकदा अडचणीत आणले आहे. व्हिडिओ पोस्ट करताना त्यांनी, “पहाटे ४ वाजता उठा, ३६ सेकंदात दोन मतं डिलीट करा, नंतर पुन्हा झोपा. अशा प्रकारे मतचोरीची घटना घडली आहे.” असे म्हणत गंभीर आरोप केले आहेत.
“निवडणूकीचा चौकीदार जागा राहून चोरी पाहत राहिला” Rahul Gandhi on Election Commission।
राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर निशाणा साधत, “निवडणूकीचा चौकीदार जागा राहून चोरी पाहत राहिला आणि चोरांना संरक्षण देत राहिला.” असे म्हटले आहे. त्याआधी गुरुवारी, ३१ मिनिटांच्या सादरीकरणात त्यांनी मतचोरीचे आरोप केले आणि पुरावे असल्याचा दावा केला. ते म्हणाले की, “निवडणूक आयोग जाणूनबुजून काँग्रेसच्या मतांना लक्ष्य करत आहे आणि त्यांची नावे डिलीट करत आहे.”
सुबह 4 बजे उठो,
36 सेकंड में 2 वोटर मिटाओ,
फिर सो जाओ – ऐसे भी हुई वोट चोरी!चुनाव का चौकीदार जागता रहा, चोरी देखता रहा, चोरों को बचाता रहा।#VoteChoriFactory pic.twitter.com/pLSKAXH1Eu
— Rahul Gandhi (@RahulGandhi) September 19, 2025
हे आरोप खोटे आणि निराधार -निवडणूक आयोग Rahul Gandhi on Election Commission।
गुरुवारी राहुल गांधी कर्नाटकातील मतदारांना घेऊन आले ज्यांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली होती. काँग्रेस नेत्याने आरोप केला की भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे भारतीय लोकशाही नष्ट करणाऱ्यांना संरक्षण देत आहेत. महाराष्ट्र, हरियाणा आणि उत्तर प्रदेशात हे घडत असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, निवडणूक आयोगाने राहुल गांधींचे आरोप खोटे आणि निराधार असल्याचे फेटाळून लावले. आयोगाने म्हटले आहे की कोणताही नागरिक ऑनलाइन कोणाचेही मत हटवू शकत नाही. मत हटवण्यापूर्वी संबंधित व्यक्तीला त्यांची बाजू मांडण्याची संधी दिली जाते.





