N. Bhaskar Rao : अविभाजित आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन.भास्कर राव (N. Bhaskar Rao) यांचे बुधवारी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. आंध्रमधील विद्यमान मंत्री आणि जनसेना पक्षाचे नेते नादेंदा मनोहर यांचे ते वडील होत. वृद्धापकाळामुळे विविध व्याधींनी ग्रस्त राव (N. Bhaskar Rao) यांना हैदराबादमधील रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दिग्गज नेते दिवंगत एन.टी.रामा राव (एनटीआर) यांनी स्थापन केलेल्या तेलगू देसम पक्षाचे (टीडीपी) भास्कर राव सहसंस्थापक मानले जातात. N. Bhaskar Rao एनटीआर यांच्या नेतृत्वाखालील आंध्र सरकारमध्ये भास्कर राव (N. Bhaskar Rao) मंत्री होते. त्यांनी नंतर वर्ष १९८४ मध्ये एनटीआर यांच्या विरोधातील राजकीय बंडाचे नेतृत्व केले. सत्तापालटानंतर स्वत: भास्कर राव मुख्यमंत्री बनले. मात्र, त्यांचे मुख्यमंत्रिपद केवळ महिनाभरच टिकले. त्यानंतर भास्कर राव कॉंग्रेसच्या तिकिटावर वर्ष १९९८ मध्ये लोकसभेवर निवडून गेले. पुढे वर्ष २०१९ मध्ये त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. भास्कर राव यांच्या निधनाबद्दल सर्वपक्षीयांनी दु:ख व्यक्त केले. त्यांच्या पार्थिवावर हैदराबादमध्ये २४ एप्रिलला अंत्यसंस्कार केले जातील.