Rohit Pawar: “भीमनवारांनी राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे पाठवला, पण…”; रोहित पवारांचा मोठा दावा
Rohit Pawar: '...तर पुणे बंद पाडू' रोहित पवारांचा इशारा

Rohit Pawar: गेल्या पाच दिवसांपासून शरद पवार गटाचे नेते रोहित पवार ( Rohit Pawar ) MPSC विद्यार्थ्यांसोबत पुण्यातील एस.एम जोशी पुलाजवळ आंदोलन करत आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी त्यांचा राजीनामा पदाचा राजीनामा द्यावा, या प्रमुख मागणीसह विद्यार्थी आंदोलन करत असून अनेक दिग्गज नेतेमंडळींकडून या आंदोलनाला पाठिंबा मिळत आहे. याचदरम्यान आता रोहित पवार यांनी प्रसारमाध्मांसोबत संवाद साधताना मोठा दावा केला आहे.
‘मुख्यमंत्र्यांना राजीनामा पाठवून काही होणार नाही’ (Rohit Pawar)
“महाराष्ट्र लोक सेवा आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी त्यांचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवला आहे. परवा संध्याकाळी साडेसात ते आठ वाजता भीमनवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा पाठवला आहे. पण मुख्यमंत्र्यांना राजीनामा पाठवून काही होणार नाही. भीमनवार यांनी आपला राजीनामा राज्यपालांना पाठवायला हवा होता.
आता हा विषय मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात आहे. पण देवेंद्र फडणवीस यांना एकच भीती आहे की, आता जर भीमनवार यांचा राजीनामा घेतला तर उद्या सामान्य लोक कोणाचाही राजीनामा मागतील. उद्या मुख्यमंत्र्यांचा राजीनामाही मागितला जाऊ शकतो. त्यामुळे आता हा सगळा खेळ इगोचा झाला आहे,” असे रोहित पवार यांनी म्हंटले आहे.
‘निर्णय घेतला नाही तर पुणे बंद पाडू’ (Rohit Pawar)
“भीमनवार यांनी राज्यपालांकडे देणे अपेक्षित होते. पण शेवटी मित्र सत्तेत आहे, मुख्यमंत्री आहे. त्यामुळे भीमनवार यांनी खेळी खेळली असावी. मी राजीनामा दिलाय, मी यात नाही, तुम्हाला मला वाचवायचं आहे. त्यांनी हा चेंडू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात ढकलला आहे.
आम्हाला आतल्या गोटातून कळालेली माहिती खरी आहे. मुख्यमत्र्यांनी आता ठरवावे की, मित्राला वाचवायचं, इ गो जपायचा की विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य करायच्या. आजच्या कॅबिनेटममध्ये भीमनवार यांच्या राजीनाम्याबाबत चर्चा होईल. मुख्यमंत्र्यांनी त्यावर आज निर्णय घेतला नाही तर आम्ही पुणे बंद पाडू,” असा इशारा रोहित पवार यांनी दिला.
29 खासगी अभ्यासिका चालकांसह 51 विद्यार्थ्यांना नोटिसा (Rohit Pawar)
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यपद्धतीबाबत विविध मागण्यांसाठी पुण्यात तीन ठिकाणी आंदोलने सुरू आहेत. दरम्यान,पोलिसांनी या आंदोलनांना परवानगी नाकारल्यानंतर आंदोलनांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मदत करणाऱ्या 29 खासगी शिकवणी व अभ्यासिका चालकांसह 51 विद्यार्थ्यांना पोलिसांनी नोटिसा बजावल्या आहेत.
हेही वाचा:





