अश्विन हा भारताकडून कसोटीत सर्वाधिक विकेट्स घेणारा दुसरा गोलंदाज आहे. अश्विनने १०६ कसोटी सामन्यांमध्ये ५३७ विकेट्स घेतल्या. सर्वाधिक कसोटी विकेट्स घेण्याच्या बाबतीत अनिल कुंबळे अव्वल स्थानावर आहे. त्याने त्याच्या कारकिर्दीत ६१९ विकेट्स घेतल्या. अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला निरोप दिला असला तरी तो अजूनही क्रिकेट खेळत आहे.
\nहेही वाचा – Shahid Afridi : शाहिद आफ्रिदीच्या वादग्रस्त विधानांमुळे खळबळ; दानिश कनेरियाचे चोख प्रत्युत्तर
\nबीसीसीआयकडून अश्विनचे कौतुक –
\n\n\nCongratulations to @ashwinravi99 on being conferred the prestigious Padma Shri award by the Hon’ble President of India @rashtrapatibhvn, honouring his remarkable achievements and an illustrious career with #TeamIndia pic.twitter.com/8HlYQx3Dsl
\n— BCCI (@BCCI) April 28, 2025
\nअश्विन सध्या आयपीएलच्या १८ व्या हंगामात चेन्नई सुपर किंग्जकडून खेळत आहे. त्याचा व्हिडीओ शेअर करताना बीसीसीआयने कॅप्शनमध्ये लिहिले, भारताच्या माननीय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रतिष्ठित पद्मश्री पुरस्काराने सन्मानित झाल्याबद्दल रविचंद्रन यांचे अभिनंदन. जे त्याच्या उल्लेखनीय कामगिरीसाठी आणि टीम इंडियासोबतच्या चमकदार कारकिर्दीसाठी मिळाले.