Danish Kaneria slam to Shahid Afridi after blaming India : पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीच्या अलिकडच्या विधानांवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. विशेषतः पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत त्यांनी केलेल्या विधानांवर जोरदार टीका होत आहे. आफ्रिदीने भारतीय माध्यमे आणि सैन्यावर निराधार आरोप केले आणि म्हटले की भारताने कोणत्याही पुराव्याशिवाय पाकिस्तानवर हल्ला केल्याचा आरोप केला आहे. आता त्याला दानिश कनेरियाने चोख प्रत्युत्तर दिले आहे.
शाहिद आफ्रिदी काय म्हणाला?
शाहिद आफ्रिदी पाकिस्तानी वृत्तवाहिनी समा टीव्हीवर म्हणाला, ‘भारतात एकही फटाका फुटला तर लोक पाकिस्तानला दोष देतात. पहलगाममध्ये, दहशतवादी तासभर लोकांना मारत राहिले आणि ८ लाखांपैकी एकही भारतीय सैनिक आला नाही. पण जेव्हा ते नंतर आले, तेव्हा त्यांनी १० मिनिटांतच पाकिस्तानला दोष द्यायला सुरुवात केली.’ शाहिद आफ्रिदीने भारतावर स्वतःच्या लोकांना मारण्याचा आणि नंतर पाकिस्तानवर आरोप करण्याचा आरोपही केला.
View this post on Instagram
दानिश कनेरियाने आफ्रिदीवर साधला निशाणा –
He has consistently aligned himself with extremist views. In my opinion, he should not be given a platform on Indian television or within the country. Additionally, he tried to persuade me to convert to Islam and declined to share a meal with me, which I found deeply… https://t.co/gArYTNX1x4
— Danish Kaneria (@DanishKaneria61) April 28, 2025
आफ्रिदीच्या या विधानांनंतर पाकिस्तानचा माजी फिरकी गोलंदाज दानिश कनेरियाने त्याच्यावर जोरदार टीका केली आहे. कनेरियाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर म्हटले की आफ्रिदी नेहमीच कट्टरपंथी विचारसरणीला प्रोत्साहन देत आला आहे. कनेरियाने आरोप केला आहे की जेव्हा तो पाकिस्तान संघाचा भाग होता तेव्हा आफ्रिदीने त्याला इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी दबाव आणला होता आणि त्याच्यासोबत जेवण्यासही नकार दिला होता. कनेरियाने या वर्तनाला अपमानास्पद म्हटले.
हेही वाचा – Sanjana Ganesan : अंगदला ट्रोल करणाऱ्यांना संजनाचं सणसणीत प्रत्युत्तर; म्हणाली, ‘आमचा मुलगा तुमच्या…’
पाकिस्तानलाही केले होते लक्ष्य –
I commend Prime Minister @narendramodi for choosing to speak in English during the rally, ensuring that the world hears his warning loud and clear. Hopefully, just like in Gaza, this marks the beginning of the end for terrorism in South Asia.
pic.twitter.com/XN6xlKWNSU— Danish Kaneria (@DanishKaneria61) April 24, 2025
दानिश कनेरियाने काही दिवसांपूर्वी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनाही फटकारले होते. तो म्हणाला होता की, ‘जेव्हा कोणी दहशतवाद्यांना ‘स्वातंत्र्यसैनिक’ म्हणतो तेव्हा ते थेट राज्य पुरस्कृत दहशतवाद स्वीकारतात. त्याने पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल ट्विट केले आणि म्हटले की, हिंदूंना लक्ष्य करणे हे सुनियोजित मानसिकतेचे परिणाम आहे आणि पीडितांना न्याय मिळाला पाहिजे. कनेरियाने बलुचिस्तानच्या मुद्द्यावरही पाकिस्तानवर टीका केली आणि म्हटले की, बलुच लोकांवर अत्याचार करणाऱ्यांच्या पाठीशी उभे राहणे लज्जास्पद आहे.