PYC Vijay Pusalkar Premier League 2023 : टायफून्स, लायन्स उपांत्यपूर्व फेरीत…

पुणे – पीवायसी हिंदू जिमखाना क्लबच्या वतीने आयोजित दहाव्या पीवायसी- विजय पुसाळकर प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत टायफून्स, लायन्स, बुल्स, स्नो लेपर्ड्स, टायगर्स, डॉल्फिन्स,बॉबकॅट्स, स्टॅलियन्स या संघांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
पीवायसी मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत अमित कुलकर्णी नाबाद २४ धावांच्या जोरावर डॉल्फिन्स संघाने शार्क्स संघाचा ६ गडी राखून पराभव केला. अभिषेक ताम्हाणे (नाबाद ८१ धावा) याने केलेल्या धडाकेबाज फलंदाजीच्या जोरावर टायगर्स संघाने चिताज संघाचा ११ धावांनी पराभव केला.
Khelo India Para Games 2023 : पॉवरलिफ्टिंगमध्ये अमळनेरच्या दिनेश बागडेला ब्रॉंझपदक…
अन्य लढतीत देव शेवाळे (२० धावा व १-११) याने केलेल्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर कोतवाल युनिकॉर्न संघाने बेलवलकर बॉबकॅट्सचा १४ धावांनी पराभव केला. क्रिश शहा नाबाद ३५ धावांच्या जोरावर जीएम टायफून्स संघाने साठे-बोथरा जॅगवॉर्सचा ८ गडी राखून पराभव करत आगेकूच केली. अनुज लोहाडे नाबाद ४९ धावांच्या जोरावर राहुल वेअर वुल्व्हस संघाने ट्रुस्पेस नाइट्सचा ५४ धावांनी पराभव केला.





