Paris Olympics 2024 (Wrestling) : निशा दहियाने युक्रेनच्या रिझकोचा केला पराभव, काही वेळातच होणार उपांत्यपूर्व फेरीचा सामना…

Paris Olympics 2024 (Wrestling) : भारताच्या निशा दहियाने (Nisha Dahiya) पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला कुस्तीच्या 68 किलो वजनी गटात शानदार सुरुवात केली आहे. निशाने राउंड आॅफ 16 फेरीत युक्रेनच्या टेटियाना रिझकोचा (Tetiana Rizhko) पराभव केला. निशाने रिझकोवर 6-4 असा विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे.
निशा सुरुवातीला टेटियानापेक्षा मागे होती पण 4-4 अशी बरोबरी झाल्यानंतर तिने शेवटच्या काही सेकंदात टेटियानाला मॅटमधून बाहेर काढत दोन गुण घेत विजय मिळवला. तिचा उपांत्यपूर्व सामना संध्याकाळी 7.50 वाजता सुरू होईल.
wrestling:Nisha Dahiya advances to the quarterfinals. She defeated Tetiana Rizhko by 6-4 in the first round. #parisolympic #Cheer4Bharat #wrestling @mansukhmandviya, @IndiaSports, @MIB_India, @PIB_India, @DDNewslive, @DDIndialive, @AkashvaniAIR, @Media_SAI pic.twitter.com/rlrS0nUyGW
— Doordarshan Sports (@ddsportschannel) August 5, 2024
दरम्यान, गेल्या वेळी टोकियो ऑलिम्पिकमध्ये रवी दहिया आणि बजरंग पुनिया यांनी अनुक्रमे रौप्य आणि कांस्यपदक जिंकले होते. हे दोन्ही कुस्तीपटू यावेळी ऑलिम्पिकसाठी पात्र ठरू शकले नाहीत ही निराशाजनक बाब आहे. भारताने 2008 च्या बीजिंग ऑलिम्पिकपासून प्रत्येक ऑलिम्पिक स्पर्धेत कुस्तीमध्ये पदके जिंकली आहेत. यावेळी पुरुष गटात फक्त अमन सेहरावतने (57 किलो) यंदा ऑलिम्पिकची पात्रता मिळवलेली आहे. यावेळी पदकाची जबाबदारी महिलांवर असून विनेश फोगट (50 किलो), अंतिम पंघाल (53 किलो), अंशू मलिक (57 किलो), निशा दहिया (68 किलो) आणि रितिका हुडा (76 किलो) वजनी गटात आव्हान देतील. त्यामुळे कुस्तीत महिलांवरच भारताची भिस्त असणार आहे.
कुस्ती : भारताची ऑलिम्पिकमधील कामगिरी
खशाबा जाधव : (57 किलो, कांस्यपदक, हेलसिंकी 1952)
सुशील कुमार : (66 किलो, कांस्यपदक, बिजिंग 2008)
सुशील कुमार : (66 किलो, रौप्यपदक, लंडन 2012)
योगेश्वर दत्त : (60 किलो, कांस्यपदक, लंडन 2012)
साक्षी मलिक : (58 किलो, कांस्यपदक, रियो 2016)
रवि दहिया : (57 किलो, रौप्यपदक, टोकियो 2020)
बजरंग पुनिया : (65 किलो, कांस्यपदक, टोकियो 2020)





