Syed Modi International 2024 : पी.व्ही सिंधूची उपांत्यपूर्व फेरीत धडक…

Syed Modi International 2024 : दोन वेळची ऑलिम्पिक पदक विजेती पी. व्ही. सिंधू हिने गुरुवारी लखनौमध्ये सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय 2024 बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व (QUARTER FINAL) फेरीत प्रवेश केला. सिंधूने पहिल्या फेरीत अनमोल खरब हिचा पराभव करून दुसऱ्या फेरीत भारताच्याच इरा शर्माविरुद्ध संघर्षमय विजय नोंदवला. 49 मिनिटे चाललेल्या या सामन्यात सिंधूने 21-10, 12-21, 21-15 असा विजय मिळवला.
महिला एकेरीत 18व्या क्रमांकावर असलेल्या सिंधूने पहिला गेम सहज जिंकला. पण 147व्या क्रमांकावर असलेल्या इरा शर्माने दुसऱ्या गेममध्ये 10 गुण मिळवत 11-1 अशी आघाडी घेतली. इराने आपली आघाडी कायम राखली आणि सामना निर्णायक गेमपर्यंत नेला.
PV Sindhu advanced to the Women’s Singles quarter-final with a victory in an all-Indian battle against Ira Sharma, winning 21-10, 12-21, 21-15 in the Round of 16 at the #SyedModiIndiaInternational2024!
Lakshya Sen is set to play later today against Daniil Dubovenko of Israel.… pic.twitter.com/X4OF3Ow6XJ
— Doordarshan Sports (@ddsportschannel) November 28, 2024
तिसऱ्या गेममध्ये दोन्ही खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा झाली. ब्रेकपर्यंत इरा शर्माने 2 गुणांची थोडीशी आघाडी घेतली होती. मात्र, सिंधूने जोरदार पुनरागमन करत स्कोअर 15-15 करत बरोबरी साधली आणि त्यानंतर सलग सहा गुण जिंकून उपांत्यपूर्व फेरी गाठली. आता सिंधूचा पुढील सामना चीनच्या दाई वांगशी होणार आहे. दाई वांग (चीन) हिने भारताच्या देविका सिहागचा 21-14, 21-15 असा पराभव करत आगेकूच केली आहे.
Syed Modi International 2024 : पी.व्ही सिंधू अन् लक्ष्य सेनची दुसऱ्या फेरीत धडक…
उन्नती, तसनीम अन् श्रीयांशी उपांत्यपूर्व फेरीत…
अन्य महिला एकेरीच्या लढतीत भारताच्या 17 वर्षीय उन्नती हुडाने चौथ्या मानांकित थायलंडच्या पोर्नपिचा चोकिवाँग हिचा 21-18, 22-20 असा पराभव करून सर्वांना आश्चर्यचकित केले. हा सामना 46 मिनिटे चालला. याशिवाय तसनीम मीरने अनुपमा उपाध्याय हिचा 21-15, 13-21, 21-7 असा पराभव केला तर श्रीयांशी वलीशेट्टीने मालविका बनसोडचा 21-12, 21-15 असा पराभव करत पुढील फेरीत आगेकूच केली.





