Paris Olympics 2024 (Archery) : भारतीय महिला तिरंदाजी संघाची उपांत्यपूर्व फेरीत धडक…

India Archery Paris Olympics 2024 : पॅरिस ऑलिम्पिकच्या मानांकन फेरीत (Ranking Round) भारताच्या महिला तिरंदाजी संघाने चांगली कामगिरी केली आहे. दीपिका कुमारी, अंकिता भगत आणि भजन कौर यांनी एकत्रितपणे भारताला 1,983 गुण मिळवून दिले आहेत. यासह भारतीय संघ चौथे स्थान मिळवत उपांत्यपूर्व फेरीत स्थान निश्चित केले आहे.
वैयक्तिक गुणांबद्दल बोलायचे झाल्यास, भारतासाठी सर्वोत्कृष्ट कामगिरी अंकिता भगतने केली, तिने 72 शॉट्स मारून एकूण 666 गुण मिळवले आणि ती 11व्या स्थानावर राहिली. दुसरीकडे, दीपिका कुमारी आणि भजन कौर टॉप-20 मधून बाहेर राहिल्या.
The Indian Women’s #Archery team comprising Bhajan Kaur, Deepika Kumari and Ankita Bhakat finish 4th in the team ranking round at #paris2024olympics.
Off to the quarterfinals tomorrow! 🏹
Many congratulations to them. Let’s #Cheer4Bharat👏🏻🥳 pic.twitter.com/afSeWP55EG
— SAI Media (@Media_SAI) July 25, 2024
भारतीय खेळाडूंच्या वैयक्तिक कामगिरीवर नजर टाकल्यास अंकिता 11व्या, भजन कौर 22व्या आणि दीपिका कुमारी 23व्या स्थानावर राहिली. अंकिताने उत्तरार्धाच्या शेवटच्या दोन सेटमध्ये शानदार पुनरागमन केले, ज्यामध्ये तिने 120 पैकी 112 गुण मिळवले. शेवटच्या क्षणांमध्ये, विशेषतः 18 वर्षीय भजन कौरची अतिशय खराब कामगिरी दिसून आली, जिने एकूण 659 गुण जमा केले. दीपिका तिच्यापेक्षा एक गुण मागे होती आणि 658 गुणांसह मानांकन फेरी (Ranking Round) पूर्ण केली.
भारताचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश…
नियमांबद्दल बोलायचे झाले तर, सांघिक यादीत टॉप-4 मध्ये स्थान मिळवणाऱ्या संघांना थेट सांघिक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळेल. भारत 1983 गुणांसह चौथ्या स्थानावर असल्याने थेट उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. भारताचा आता उपांत्यपूर्व फेरीत फ्रान्स विरुद्ध नेदरलँड्स सामन्यातील विजेत्याशी सामना होईल. तर सांघिक क्रमवारीत 5 व्या ते 12 व्या क्रमांकावर असलेल्या संघांना प्रथम राउंड ऑफ 16 फेरीतून जावे लागेल.
मानांकन (Ranking Round) फेरीचा उद्देश तिरंदाजीमध्ये 128 खेळाडूंचा गट तयार करणे हा होता. आता हे 128 खेळाडू आपापल्या क्रमवारीच्या आधारे एकेरी स्पर्धेत वैयक्तिकरित्या एकमेकांसमोर उभे ठाकतील. अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी खेळाडूंना प्रथम राउंड ऑफ 64, नंतर राऊंड ऑफ 32 आणि नंतर प्री-क्वार्टर फायनल आणि सेमीफायनलमधून प्रवास करावा लागेल.





