PYC Premier League 2023 : जीएम टायफून्स, रावेतकर बुल्स उपांत्य फेरीत…

पुणे – पीवायसी हिंदू जिमखाना क्लबच्या वतीने आयोजित दहाव्या पीवायसी- विजय पुसाळकर प्रीमियर लीग क्रिकेट २०२३ स्पर्धेत जीएम टायफून्स, लायन्स, रावेतकर बुल्स, पंडित जावडेकर डॉल्फिन्स, लायन्स या संघांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला.
पीवायसी मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत रणजीत पांडे (२-७ व २९ धावा) व पराग चोपडा(नाबाद २९) यांनी केलेल्या खेळीच्या जोरावर बुल्स संघाने लाईफसायकल स्नो लेपर्डस संघाचा ७ गडी राखून पराभव केला. दुसऱ्या सामन्यात सुमेध गांगल (४० धावा) व अश्र्विन शहा (४७ धावा) यांनी केलेल्या सुरेख खेळीच्या जोरावर जीएम टायफून्स संघाने स्वोजस टायगर्स संघाचा ४५ धावांनी पराभव करून उपांत्य फेरी गाठली.
तिसऱ्या सामन्यात आनंद परचुरेच्या नाबाद ४८ धावांच्या जोरावर पंडित जावडेकर डॉल्फिन्स संघाने बेलवलकर बॉबकॅट्स संघाचा ८ गडी राखून पराभव करत उपांत्य फेरीत धडक मारली. असीम देवगांवकर(२-७) याने केलेल्या सुरेख गोलंदाजीच्या जोरावर लायन्स संघाने रॉयल स्टॅलियन्स संघावर ७ गडी राखून विजय मिळवला.
निकाल : उपांत्यपूर्व फेरी:
लाईफसायकल स्नो लेपर्डस: ६ षटकात ८ बाद ६५ (ओंकार वैद्य ३९, रोहन गाडगीळ १३; रणजीत पांडे २-७, रोहीत भालेराव २-१४, सिद्धांत चोपडा १-५) पराभुत वि.रावेतकर बुल्स: ५.४ षटकात १बाद ६८(रणजीत पांडे २९, पराग चोपडा नाबाद २९; मंदार चितळे १-१२); सामनावीर – रणजीत पांडे व पराग चोपडा;
जीएम टायफून्स: ६ षटकात २ बाद १०२ (अश्र्विन शहा नाबाद ४७, सुमेध गांगल ४०, क्रिश शहा १५; प्रतीक शेट्टी १-१२) वि.वि.स्वोजस टायगर्स: ६ षटकात ६ बाद ५७ (रोहीत मेहेंदळे २१, अभिषेक ताम्हाणे १४; राहूल गांगल २-७, निखिल कानिटकर १-२); सामनावीर – सुमेध गांगल व अश्र्विन शहा





