पुणे ‘PMPML’चालकांसाठी महत्वाची बातमी; बस चालवताना ‘या’ चुका केल्या तर होणार निलंबन

Pune News : ‘पी एम पी एम एल’ने आपल्या कर्मचाऱ्यांना कडक सुचना जारी केल्या आहेत.त्यांच्या चालकांना आणि वाहकांना गाडी चालवताना मोबाईल फोन वापरणे, तसेच तंबाखू-पान मसाला यांचे सेवन करणे, अशा कारणांसाठी निलंबित केले जाऊ शकते. पीएमपीएमएलने आपल्या कर्मचाऱ्यांना हे निर्देश दिले आहेत.
यापूर्वीही, पीएमपीएमएलने त्यांच्या चालकांना आणि वाहकांना कर्तव्यावर असताना मोबाईल फोन वापरण्यास, हेडफोन घालण्यास किंवा तंबाखू आणि पान मसाला खाण्यास मनाई करण्याचे कडक निर्देश जारी केले होते. या नियमांचे उल्लंघन केल्यास दोन महिन्यांचे निलंबन केले जाईल परिपत्रकात म्हटले होते.
सध्या पीएमपीएमएलकडे 9,400 चालक कर्मचारी आहेत, ज्यात 4,400 कंत्राटी चालकांचा समावेश आहे. आता पीएमपीएमएलने चालक किंवा वाहकांविषयीच्या तक्रारींसाठी व्हाट्सअॅप क्रमांक जारी केला आहे.
प्रवाशांनी तक्रारींचे फोटो/व्हिडिओ, बस क्रमांक, मार्ग क्रमांक, ठिकाण, तारीख आणि वेळ पीएमपीएमएलच्या ई-मेल [email protected], व्हाट्सअॅप क्रमांक 9881495589 वर पाठवण्याची विनंती केली आहे किंवा पीएमपीएमएलच्या जवळच्या डेपोमध्येही पुराव्यासह तक्रारी सादर केल्या जाऊ शकतात.





