Pune Water Supply Cut : पुणेकरांनो पाणी भरून ठेवा! गुरुवारी ‘या’ मोठ्या भागांचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद
Pune Water Supply Cut : गोखलेनगर पाण्याच्या टाकीला मुख्य जलवाहिनी जोडण्याचे काम; ४ जून (गुरुवार) रोजी संबंधित परिसराचा पाणीपुरवठा बंद.

Pune Water Supply Cut – गोखलेनगरमधील पाण्याच्या टाकीला मुख्य जलवाहिनी जोडणीचे काम करायचे असल्याने येत्या गुरूवारी (दि. ४ जून) या टाकीच्या अखत्यारीतील सर्व परिसराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच शुक्रवारी (दि. ५ जून) उशीरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता असल्याचे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने कळवले आहे.
पाणी पुरवठा बंद असणारा भाग- एस. एन. डी. डी. (एच. एल. आर.): गोखलेनगर, औध, बोपोडी, पुणे विद्यापिठ, लॉ कॉलेज रोड, महाबळेश्वर हॉटेल पर्यंत बाणेर रस्ता, बीएमसीसी कॉलेज रस्ता, आयसीएस कॉल्स भोसलेनगर, सेनापती बापट रस्ता, भांडारकर रस्ता, प्रभात रस्ता, पौड रस्ता शीला विहार कॉलनी, अद्वैत सोसा. भीमनगर, वेदांतनगरी, कुलश्री कॉलनी परिसर झोनिंग पद्धतीने, सहवास,
क्षिप्रा, मनोहन सोसा. विठ्ठल मंदिर परिसर झोनिंग करून, गोसावी वस्ती परिसर, करिष्मा सोसायटी समोरील परिसर, बीग बाझार परिसर, बंधन सोसायटी परिसर, डी. पी. रस्ता (पार्ट), मयूर कॉलनी परिसर, मयूर डी. पी. रस्त्याची डावी बाजू, कर्वे रस्ता झाला सोसायटी ते शिवाजी पुतळ्या पर्यंतचा भाग, दशभुजा गणपती ते नळस्टॉप, सहकार वसाहत म्हात्रे पुलापर्यंत एच. ए. कॉलनी टिळेकर प्लॉट, भरतनगर, अर्चनानगर, भरतकुंज, स्वप्नमंदीर, सुनीता, युको बँक कॉलनी, टँकर पॉइंट डी.पी. रस्ता मंगेशकर हॉस्पिटल,
हिमाली सोसायटी, वकिलनगर इत्यादी, करिष्मा सोसा. ते वारजे क्षेत्रीय कार्या., गिरीजा शंकर, नवसह्याद्री ताथवडे उद्यान परिसर निलकमल युनायटेड वेस्टर्न अनुरेखा स्थैर्य, मधूचय, शैलेश, अलंकार, मनिषा, स्वस्तिश्री, रघुकुल महिम्न, सुखा जयशक्ती, इत्यादी. चतुःश्रुंगी टाकी परीसर – औंध, बोपोडी, भोईटे वस्ती, पुणे विद्यापीठ, परिसर, चिखलवाडी, खडकी, आनंदपार्क, सानेवाडी, आंबेडकर वसाहत, संकल्प पार्क, सकाळनगर, चव्हाणनगर, अभिमानश्री सोसायटी, नॅशनल, सिंध सोसायटी, औंधगाव परिसर.



