Pune : अल्पवयीनकडून वाहतूक नियम मोडल्यास कडक कारवाई होणार

पुणे – कल्याणीनगरमधील अपघातानंतर वाहतूक परवाना, वाहतूक नियमचा मुद्दा पुन्हा समोर आला आहे. २०२३ या वर्षात १६ वर्षवयीन मुलांवर वाहतुकींचे नियम मोडल्याप्रकरणी २ लाख ३५ हजारांची दंडात्मक कारवाई तर २०२४च्या पहिल्या चार महिन्यांतच १६ वर्षांखाली २६ अल्पवयीनवर नियम मोडल्याचे 1 लाख 20 हजारांची दंडात्मक कारवाई करण्यात आली असल्याचे सांंगण्यात आले.
शहरात वाहन चालविताना अल्पवयीन मुला-मुलींकडून वाहतूक नियम सर्रास मोडले जात आहेत. विरुद्ध दिशेने वाहन चालविणे, परवाना नसताना वाहन चालविणे, हेल्मेट नसणे, झेब्रा क्रॉसिंगवर थांबणे, भरधाव वेगात वाहन चालवून सिग्नल मोडणे अशा विविध नियमांनुसार दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
पुणे शहरात तब्बल १९ पेक्षा अधिक ब्लॅक स्पॉटवर अपघात होत असल्याचे वाहतूक विभागाने केलेल्या सर्वेक्षणात आढळून आले आहे. वाहतूक विभागाकडून या दृष्टीने मार्ग काढण्याचा प्रयत्नही केला जात आहे. परंतु, विविध कारणांतून त्याला यश येत नसल्याचीच स्थिती आहे. त्यामुळे शहरातील ब्लॅकस्पॉटवर वारंवार अपघाताच्या घटना घडतच आहेत. अल्पवयीन मुलांकडून भरधाव वेगात वाहने चालविण्याचे व वाहतुकीचे नियम मोडण्याचे प्रकार वाढत असून त्यानुसार कडक कारवाई करण्यासाठी वाहतूक पोलिसही सरसावले आहेत.





