Pune: मद्यपींना रोखण्यासाठी सापळे; शहरात २५ चेक पोस्ट

पुणे – शहरातील वाहतूक कोंडी आणि अपघातांना बेशिस्त वाहनचालकही तितकेच जबाबदार असल्याचे लक्षात घेत वाहतूक पोलिसांनी कडक पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. यात प्रामुख्याने नो एंट्री आणि ट्रीपल सीट वाहन चालकांवर कारवाई पाठोपाठ आता ड्रंक अॅंड ड्राइव्ह कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
यासाठी वाहतूक पोलिसांनी शहरात २५ चेक पोस्ट उभारले आहेत. तसेच १२७ पोलीस कर्मचाऱ्यांचे पथक तयार केले आहे. हे पथक सहायक पोलीस आयुक्ताच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत राहणार आहे. यासाठी “ब्रेथ ॲनालाइजर’ला “युज अॅंड थ्रो’ पाइप येणार आहेत.
कारवाईच्या ठिकाणी फलकही लावले जाणार आहेत. असे पाइप पोलिसांकडे नसतील, तर तपासणी करू नका अशा सूचनाही वाहन चालकांना देण्यात आल्या आहेत. तर ट्रीपल सीट आणि नो एंट्रीतून येणाऱ्याची वाहने जप्त केली जात आहेत. त्यांना कारवाईतून कोणत्याही प्रकारची सवलत देण्यात येणार नसल्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.





