पुणे : शिक्षक बदली प्रक्रियेचे ऍप लवकरच सुरू

पुणे – राज्यातील जिल्हा परिषदांतर्गत कार्यरत शिक्षकांच्या बदली प्रक्रिया वेगाने तसेच पारदर्शक करण्यासाठी तयार केलेल्या ऍपची तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करून दोन दिवसांत चाचण्या सुरु होणार आहे. त्याद्वारे ऍपमधील अडथळे दूर करण्यात येणार आहेत.
पुणे, सातारा आणि वर्धा येथील जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची पुन्हा एक समिती स्थापन केली होती. त्या समितीच्या अनेक बैठक झाल्यानंतर बदली प्रक्रिया वेगाने तसेच पारदर्शक करण्यासाठीची प्रक्रिया सुरु झाली. दरम्यान, समितीचे सदस्य वर्धा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांच्या अध्यक्षतेखाली क्लाउड वेंडर, आयटी अधिकाऱ्यांमध्ये एक बैठक झाली. त्या बैठकीत ऍप कार्यान्वित करण्याबाबत चर्चा करण्यात आली.
शिक्षक बदली ऍपमध्ये अनेक त्रुटी दूर करण्यात आल्या असून त्या ऍपचे अनेक तज्ज्ञांनी कौतुक केले आहे, असे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले.





