Shivsena UBT : पुण्यात उद्धव ठाकरेंना धक्का; बड्या नेत्याचा कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश
Shivsena UBT : आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

Shivsena UBT : पुण्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असून, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे माजी विभागप्रमुख प्रवीण डोंगरे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री चंद्रकांत पाटील आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. (Shivsena UBT)
पुणे शहर भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीदरम्यान हा पक्षप्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला. बैठकीत आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक तयारी, एसआरआय, बीएलओ आणि पदवीधर मतदारसंघांबाबत चर्चा करण्यात आली. (Shivsena UBT)
प्रवीण डोंगरे यांनी शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे विभागप्रमुख म्हणून काम केले होते. तसेच विविध सामाजिक उपक्रम, जनआंदोलने आणि स्थानिक प्रश्नांवर ते सक्रिय होते. अलीकडे त्यांनी पुणे महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसच्या तिकिटावरही निवडणूक लढवली होती. (Shivsena UBT)
भाजपमध्ये प्रवेशानंतर बोलताना प्रवीण डोंगरे म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश विकासाच्या दिशेने वाटचाल करत आहे. तसेच मुरलीधर मोहोळ आणि आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या विकासकामांमुळे प्रेरित होऊन मी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. शिवाजीनगरमधील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी पूर्ण ताकदीने काम करणार आहे.” (Shivsena UBT)
या पक्षप्रवेशावेळी भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि डोंगरे यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या प्रवेशामुळे पुण्यातील शिवाजीनगर परिसरातील राजकीय समीकरणांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (Shivsena UBT)
Shivsena UBT : ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का; खासदारांनंतर आता मुंबईत नगरसेवक संख्या कमी होणार
ShivSena News: सहा बंडखोर खासदारांच्या गटाला ठाकरे गटाकडून आक्षेप; अन् अखेर निर्णय झालाच…






