Shivsena UBT : ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का; खासदारांनंतर आता मुंबईत नगरसेवक संख्या कमी होणार
Shivsena UBT : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला मुंबई महापालिकेत आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Shivsena UBT : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला मुंबई महापालिकेत आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भांडूप येथील प्रभाग क्रमांक १११ मधून निवडून आलेले नगरसेवक दीपक सावंत यांच्यावरील अपात्रतेची कारवाई लवकरच जाहीर होणार असून त्याबाबतची प्रत महापालिकेकडे दाखल झाली आहे.
दीपक सावंत हे कुणबी आरक्षित जागेवरून निवडून आले होते. मात्र, जात पडताळणी समितीने त्यांचा कुणबी समाजाचा दावा फेटाळून लावत जात वैधता प्रमाणपत्र रद्द केले होते. त्यानंतर त्यांच्या सदस्यत्वावर टांगती तलवार होती. आता अपात्रतेची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचल्याने त्यांची नगरसेवक पदावरील गच्छंती निश्चित मानली जात आहे.
नगरसेवकांची संख्या ६५ वरून ६४ वर येणार – (Shivsena UBT)
सावंत यांच्या अपात्रतेमुळे ठाकरे गटाच्या नगरसेवकांची संख्या ६५ वरून ६४ वर येणार आहे. त्यामुळे महापालिकेतील विविध समित्यांमधील पक्षीय संख्याबळाच्या समीकरणांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Shivsena UBT : ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का; खासदारांनंतर आता मुंबईत नगरसेवक संख्या कमी होणार
स्थायी समिती, प्रभाग समित्या तसेच इतर महत्त्वाच्या समित्यांमध्ये सदस्यसंख्या पक्षांच्या संख्याबळानुसार ठरवली जात असल्याने ठाकरे गटाच्या प्रतिनिधित्वात बदल होऊ शकतो.
दरम्यान, भांडूपमधील ही जागा रिक्त झाल्यानंतर तेथे पोटनिवडणूक होण्याची शक्यता असून, तोपर्यंत महापालिकेतील राजकीय गणितात बदल झालेला पाहायला मिळू शकतो.
भाजप सर्वात मोठा पक्ष – (Shivsena UBT)
मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपने ८९ जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष ठरला होता. तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला ६५, शिवसेना (शिंदे) गटाला २९, काँग्रेसला २४, एमआयएमला ८, मनसेला ६, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाला ३, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाला १ आणि समाजवादी पक्षाला २ जागा मिळाल्या होत्या. दीपक सावंत यांच्या अपात्रतेनंतर ठाकरे गटाचे संख्याबळ आणखी कमी होणार आहे.





