वाघोली – राष्ट्रीय स्तरावरील कुस्ती पंच तथा क्रीडाशिक्षक सचिन खांदवे (Sachin khandave) यांची कन्या राष्ट्रीय कुस्तीपटू समृद्धी सचिन खांदवे (Samruddhi khandave) हिची इंडियन नेव्हीत (Indian Navy) निवड झाली आहे. क्रीडा क्षेत्रातील योगदानानंतर समृद्धी आता नव्या क्षेत्रात आपला ठसा उमटवण्यासाठी सज्ज आहेत. नेव्हीमध्ये निवड होताच पंचक्रोशीतून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
मुलींना कुस्ती योग्य प्रशिक्षण देऊन हवेली तालुक्यात (haveli taluka) सचिन खांदवे यांनी वेगळा आदर्श उभा केला आहे. तसेच लॉकडाऊनच्या काळातही कुस्ती प्रशिक्षण देऊन त्यांनी अनोखा विक्रम देखील केला आहे. सचिन खांदवे यांची कन्या कु. समृद्धी सचिन खांदवे हिची चंदीगड या ठिकाणी होणाऱ्या ऑल इंडिया युनिव्हर्सिटी स्पर्धेसाठी तर ओमकार सचिन खांदवे (Omkar khandave) याची आग्रा या ठिकाणी होणाऱ्या जुडो स्पर्धेसाठी नुकतीच निवड झाली आहे. दोघा बहिण भावांना राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाल्याने त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.
राष्ट्रीय स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करून इंडियन नेव्हीत निवड झाल्याबद्दल व पंचक्रोशीतील गावांचे नाव उंचवण्याची परंपरा कायम राखल्याबद्दल प्रदीप कंद, रामभाऊ दाभाडे, राजेंद्र सातव पाटील, उद्योजक संतोष देशमुख, संपत गाडे, रघुनाथ गाडे, शांताराम कटके, संदीप सातव, गणेश तांबे, संदीप कटके अशा अनेक मान्यवरांनी समृद्धीचे अभिनंदन केले आहे.