Pune: परराज्यात नोंदणी, महाराष्ट्रात व्यवसाय; पुणे आरटीओकडून 55 खासगी बसवर कारवाई
Updated On:

पुणे – परराज्यातील आरटीओमध्ये वाहनांच्या नोंदी करायच्या आणि महाराष्ट्रात येऊन व्यवसाय कराऱ्या खासगी ट्रॅव्हल्सवर पुण्यातील आरटीओकडून कारवाई सुरू करण्यात आली आहे. अशा 55 बस मालकांवर पुणे आरटीओने कारवाई करून दंड वसूल केला आहे.
पुणे शहरातून दररोज हजारो ट्रॅव्हल्स धावतात. पण, काही ट्रॅव्हल्सची नोंदणी इतर राज्यात करुन त्या महाराष्ट्रात चालविल्या जात आहेत. त्यामुळे पुणे व राज्याचा महसूल बुडत आहे. या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर पुणे आरटीओने अशा ट्रॅव्हल्सचा शोध सुरू केला. त्यामध्ये महाराष्ट्रात नोंदणी नसणाऱ्या ५५ ट्रॅव्हल्स मालकांवर कारवाई करण्यात आली.
मोटार वाहन कायद्यानुसार त्या राज्यात नोंदणी केलेल्या बस त्याच राज्यात चालविल्या जाव्यात. तसे नसल्यास कारवाई केली जाईल, असा इशारा आरटीओने दिला आहे.





