Pune: नाना पेठेत पुणे महापालिकेची मोठी कारवाई; आंदेकर टोळीच्या अवैध बांधकामावर हातोडा

Pune Crime | आयुष कोमकर खून प्रकरणी माजी नगरसेवक वनराज आंदेकरची पत्नी सोनाली आंदेकर ही पुणे पोलिसांच्या रडारवर होती. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत सोनाली आंदेकरला ताब्यात घेतलं. विशेष म्हणजे आयुष कोमकर हत्या प्रकरणात आता संपूर्ण आंदेकर कुटुंब पोलिसांच्या ताब्यात आहे.
याशिवाय पोलिसांनी कारवाई करत आंदेकर कुटुंबाची सगळी बँक खाती, लॅाकर सील केली आहेत. सगळ्या मालमत्तांची माहिती नोंदणी महानिरीक्षकांकडून घेऊन फॅारेन्सिक ॲाडिटरद्वारा तपास सुरू आहे. तसेच, जप्तीची कारवाई केली जाणार असल्याची देखील माहिती समोर आली आहे.
दरम्यान, आता पुणे पोलिसांनी आंदेकर टोळीच्या मुसक्या आवळ्याला सुरुवात केली. पुण्यात आंदेकर टोळीच्या अवैध बांधकामावर पोलिसांचा हातोडा पडला आहे. नाना पेठे मधीलअनधिकृत फ्लेक्स आणि बांधकाम पाडायला पोलिस आणि पालिकेकडून सुरुवात केली आहे. ज्या ठिकाणी अतिक्रमण झाले आहे देखील पाडण्यात आलं आहे. पुणे महानगर पालिका आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाकडून ही कारवाई करण्यात आली आहे.
काय आहे प्रकरण?
पुण्यातील नाना पेठेत गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला आयुष कोमकर याची हत्या झाली होती. वनराज आंदेकरच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आंदेकर टोळीने हे कृत्य केलं होतं. याप्रकरणी पोलिसांनी बंडू ऊर्फ सूर्यकांत राणोजी आंदेकर याच्यासह १५ आरोपींना अटक केली आहे.
हेही वाचा:
दाल सरोवरात सापडले पाकिस्तानी क्षेपणास्त्र ; ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान पाकिस्तानने रचला होता कट





