Pune Municipal Corporation : पुणे महानगरपालिका भरती घोटाला, आरोपी डॉ. राजेंद्र खेडेकर जामीन मंजूर
हापालिकेत विविध पदांवर नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी आरोपी डॉ. राजेंद्र खेडेकर याला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली होती.

Pune Municipal Corporation – महापालिकेत विविध पदांवर नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी आरोपी डॉ. राजेंद्र खेडेकर याला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली होती. न्यायालयाने पोलिस कोठडी नंतर त्याची रवानगी न्यायालयीन कोठडी मध्ये केली होती. या कथित भरती गैरव्यवहार प्रकरणात सहभागी आरोपींनी अनेक व्यक्तींना बनावट नियुक्तीपत्रे देऊन त्यांच्याकडून जवळपास एक कोटी पंच्यांनव लाख न अधिक रक्कम लाटल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले होते.
या प्रकरणी जेजुरी येथील मार्तंड देवस्थानचा विश्वस्त राजेंद्र बबनराव खेडेकर याच्यासह महापालिकेच्या शिक्षण विभागातील शिपाई शिवानंद बाळासाहेब पाटील आणि अन्य आरोपींविरोधात भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. हा प्रकार मे २०२२ ते मे २०२६ या कालावधीत घडल्याचे तक्रारीत म्हटले आहे. आरोपींनी बेरोजगारांना पालिकेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे प्राप्त झाल्या होत्या.
आरोपींनी आपसांत संगनमत करून महापालिकेचे बनावट लेटरहेड, शिक्के आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या खोट्या स्वाक्षऱ्यांचा वापर करून बोगस नियुक्तीपत्रे तयार केली. त्यांनी उमेदवारांना बनावट नियुक्तीपत्रे, ओळखपत्रे, सेवा पुस्तिका, वैद्यकीय प्रमाणपत्रे आणि पगाराच्या पावत्याही दिल्या;
इतकेच नव्हे तर उमेदवारांचा विश्वास बसावा यासाठी त्यांच्या बँक खात्यात पगार जमा झाल्याचे दाखविले, असे तक्रारींमध्ये नमूद आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर खेडेकर पसार झाला होता. त्यानंतर त्याला भारती विद्यापीठ पोलिसानी अटक केली होती. तपासनांतर आरोपी डॉ राजेंद्र खेडेकर यांची न्यायालयीन कोठडी मध्ये रवानगी करण्यात आली होती.
सदर गुन्ह्यात आरोपी डॉ राजेंद्र खेडेकर याने अॅड अमेय बलकवडे यांच्या मार्फत मे कोर्टात जामीन मिळणेकमी अर्ज केला होता. सदर अर्जावर युक्तिवाद करताना आरोपी व फिर्यादी याच्या भावाचे जुने मालमत्तेसंबंधी वाद असून, सदर गुन्ह्यामध्ये संपूर्ण पुरावे कागदोपत्री असून ते पोलिसानी आधीच जप्त केले आहेत.
तसेच आरोपीकडून कोणत्याही प्रकारची रिकव्हरी बाकी नाहीये तसेच गुन्ह्याचा प्रथमदर्शी तपास पूर्ण झाला असून त्यामुळे आरोपीच्या न्यायालयीन कोठडीची आवश्यकता नाही असा युक्तिवाद करण्यात आला. सदर युक्तिवाद ग्राह्य धरून मे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी साहेब श्रीमती व्ही. व्ही. गिरम साहेब यांनी आरोपीला रु. १,००,०००/- च्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला.
आरोपींच्या वतीने वकील अॅड अमेय बलकवडे, अॅड वैभव हाटकर, अॅड सुहेल बढे, अॅड सायली मांडेकर, अॅड ओंकार चव्हाण, अॅड मंगेश सोन्नर, अॅड ओंकार जगताप,अॅड पूजा सिंघ, अॅड प्रदीप माने, अॅड आदित्य खोपडे, अॅड विक्रम कोंडगुळी, अॅड मयूर टकले यांनी कामकाज पाहिले.





