Pune Crime | व्यावसायिक तंटा झाला हिंसक! दाम्पत्याला बेदम मारहाण ; सहा जणांविरुद्ध गुन्हा

प्रभात वृत्तसेवा
पुणे – व्यवसायाच्या जागेवरुन झालेल्या वादातून टोळक्याने दाम्पत्याला बेदम मारहाण केली. ही घटना श्री तांबडी जोगेश्वरी मंदिर परिसरात घडली. या प्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.याप्रकरणी मयुर हनुमंत आवळे ( ३०, रा. धनकवडी) यांनी विश्रामबाग ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, आवळे हे श्री तांबडी जाेगेश्वरी मंदिर परिसरात आसन विक्रीचा व्यवसाय करतात. मंदिरासमोरील मोकळ्या जागेत किरकोळ वस्तुंची विक्री करणारे व्यावसायिक पथारी मांडून व्यवसाय करतात.
तेथे व्यवसाय करण्याच्या वादातून आरोपींनी शुक्रवारी (१९ सप्टेंबर) दुपारी साडेचारच्या सुमारास आवळे आणि त्यांच्या पत्नीला बांबूने मारहाण केली. मारहाणीत आवळे दाम्पत्य जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयमाला पवार यांनी घटनास्थळी भेट दिली. पसार झालेल्या आरोपींचा शोघ सुरू असून, पोलीस उपनिरीक्षक नाईकवाडे तपास करत आहेत.





