Pune News : पुण्यात अश्लील चाळे करणारा तरूण कोण? कोणते गुन्हे दाखल केले? पोलिसांनी दिली सविस्तर माहिती….

Pune News : सध्या पुण्यातील गुन्हेगारीचा आलेख वाढतच चाललेला आहे. यामुळे महिला सुरक्षेचा प्रश्न दिवसागणिक गंभीर बनत चाललेला आहे. स्वारगेट बसस्थानकात तरुणीवर अतिप्रसंग करण्यात आल्याची घटना घडली होती. त्यानंतर पुण्यात टॅक्सीने प्रवास करणाऱ्या महिलेला अशाच प्रकाराचा अनुभव आला. मात्र, महिलेने थेट पोलिस ठाणे गाठल्याने पुढे घडणारा मोठा अनर्थ टळला आहे.
आज सकाळी महिला दिनी पुण्यात एक अत्यंत घृणास्पद प्रकार घडला आहे. या प्रकारामुळे पुण्यात पोलिसांचा धाक राहिलाय का नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. एका महागड्या गाडीत मद्यधुंद अवस्थेत असलेल्या तरुणाने महिलांना अश्लिल चाळे केले आहेत. तसेच या तरुणाने चौकात सिंग्लनला गाडी थांबवत लघू शंका देखील केली आहे. या अत्यंत घृणास्पद प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
येरवडा भागातील शास्त्रीनगर चौकाता ही घटना घडली आहे. महिलांच्या समोर संबंधिताने अश्लील चाळे केले. BMW या महागड्या गाडीत मद्यधुंद अवस्थेत हा तरुण होता. त्यासोबत गाडीत त्याचे इतर दोन मित्र्यांनीही मद्याचे प्राशन केले होते. महिलांना अश्लील चाळे करून ही गाडी आणि त्यातील तरुण वेगाने वाघोलीच्या दिशेने निघून गेले, अशी प्राथमिक माहिती मिळत आहे. या BMW महागड्या कारचा नंबर MH-12 RF8419 आहे.
गौरव आहुजा असं या प्रकरणातील आरोपीचं नाव आहे. या प्रकरणामुळे शहरात वातावरण चांगलंच तापलं आहे. या घटनेबाबत पुण्याचे पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली आहे. ते म्हणाले, “या प्रकरणातील दोन्ही आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आज सकाळी 7:30 शास्त्रीनगर मध्ये जी घटना घडली याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लवकर आरोपीला ताब्यात घेणार आहोत. काही इनपुट आम्हाला मिळाली आहेत. असं त्यांनी सांगितलं आहे.
पुण्यात दारू पिऊन, हातात बियरच्या बॉटल घेत, भर रस्त्यात गाडी लावून, रोड वर लघवी करताना करोडपती वडिलांचे ‘सु’ पुत्र… pic.twitter.com/KfcRdjRqam
— Saurabh Koratkar (@saurabhkoratkar) March 8, 2025
तसेच ते पुढे म्हणाले, “त्याच्यावर आधी एक गुन्हा दाखल आहे, त्या संदर्भात माहिती नाही. गरज लागली कुटूंबातील लोकांना चौकशीला बोलवणार आहोत. विनयभंगाच्या गुन्हासंदर्भात महिलांच्या कुणाच्या अद्याप तक्रारी आल्या नाहीत, तक्रारी आल्यावर निर्णय घेणार आहेत. आरोपीचे कुटुंबीय नातेवाईक आणि मित्रांची संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू आहे. तरूणांनी चौकात लघुशंका अश्लील वर्तन केले आहे. CCTV आधारे नाव निष्पन केले आहे. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. आरोपी पकडण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती पोलिस उपायुक्तांनी दिली आहे.
वडिलांची पहिली प्रतिक्रिया समोर….
पुण्यात नंगानाच करणाऱ्या या तरुणाच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया आता समोर आली आहे. गौरव आहुजा याचे वडील मनोज आहुजा यांनी देखील या घटनेवर संताप व्यक्त केला आहे. ‘गैरव माझा मुलगा असल्याची लाज वाटते, त्याने सिग्नलवर लघुशंका नाही केली तर माझ्या तोंडावर केली आहे. मुलाचा मोबाईल सकाळपासून बंद आहे. माझ्यावर जी काही कारवाई होईल ती मला मान्य आहे, असं मनोज अहुजा यांनी म्हटलं आहे.





