Pune News : टिकाराम जगन्नाथ महाविद्यालयाचा उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्काराने गौरव !

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समितीच्या वतीने खडकी शिक्षण संस्थेच्या टिकाराम जगन्नाथ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयास उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्काराने गौरविण्यात आले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे क्रीडा संचालक दिपक माने, डॉ दत्ता महादम, ओतूर येथील आण्णासाहेब वाघिरे महाविद्यालयाचे प्राचार्य तथा पुणे जिल्हा क्रीडा विभागीय क्रीडा समितीचे अध्यक्ष डॉ. महेंद्र अवघडे यांचे हस्ते खडकी शिक्षण संस्थेचे सहसचिव तथा टिकाराम जगन्नाथ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संजय चाकणे आणि क्रीडा संचालक डॉ.महेश बेंडभर यांनी पुरस्कार स्वीकारला.
खडकी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांनी कौतुक करत महाविद्यालयासाठी ही खूप मोठी अभिमानाची बाब आहे असे मत व्यक्त केले. खडकी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अनिल मेहता, सचिव आनंद छाजेड, सहसचिव सुरजभान अगरवाल व खडकी शिक्षण संस्थेचे सर्व संचालक मंडळ यांनी पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर महाविद्यालयाचे तथा क्रीडा विभागाचे अभिनंदन केले.
पुरस्कार वितरण सोहळ्या प्रसंगी कार्यालय अधिक्षक लक्ष्मण डामसे, महादेव रोकडे व राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. निलेश काळे उपस्थित होते. महाविद्यालयात क्रीडा विभागाचे सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांच्या वतीनेही अभिनंदन करण्यात आले.





