Navratri Festival : नवरात्रोत्सवात अंबाबाईच्या दर्शनाला; भाविकांचा महापुर
Navratri Festival : गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा भाविकांची गर्दी कमी

कोल्हापूर : शारदीय नवरात्रोत्सव कालावधीत करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनाला देशभरातील भाविकांनी मोठी गर्दी केली होती. नवरात्रोत्सवात 11 लाख 7 हजार 79 भाविकांनी श्री अंबाबाईचे दर्शन घेतले. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा दुष्काळ व उन्हाचा तडाखा यामुळे भाविकांची गर्दी कमी जाणवली.
नवरात्रोत्सवात भाविकांसाठी दर्शनरांग तसेच भाविकांना अन्य सुविधा उपलब्ध करुन देण्यास पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने प्राधान्य दिल्याचे सचिव वर्षा साळुंखे यांनी सांगितले.
यावर्षी देखील गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी एआय तंत्रज्ञानाचा अवलंब केला होता, त्यामुळे गर्दीवर नियंत्रण व भाविकांची सुरक्षेची काळजी घेण्यात आली. तर मंदिर परिसरात उघडण्यात आलेल्या वैद्यकीय कक्षाचा 1100 भाविकांनी लाभ घेतला असल्याचे सांगण्यात आले.
हेही वाचा:





