Manoj Jarange : “जरातरी माणुसकी आणि लाज…”; कथित ऑडिओ क्लिपवरून शिवसेना नेत्याने मनोज जरांगेंना सुनावले
Manoj Jarange : एकनाथ शिंदेंनी मनोज जरांगेंना 500 कोटी दिले, अशी भाजपमध्ये कुजबूज सुरु असल्याचा जरांगेचा गंभीर आरोप

Manoj Jarange : खासदार श्रीकांत शिंदेंच्या माध्यमातून एकनाथ शिंदेंनी मनोज जरांगेंना 500 कोटी दिले, अशी भाजपमध्ये कुजबूज सुरु असल्याचा गंभीर आरोप दसरा मेळाव्यात मनोज जरांगेंनी केला. यावरून राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. मात्र मनोज जरांगे यांचे आरोप एकनाथ शिंदे यांनी फेटाळून लावले. आपण कोणालाही 500 कोटी रुपये दिले नाहीत आणि कोणाकडून घेतलेही नाहीत, असे त्यांनी सांगितले.
यानंतर आता मनोज जरांगे यांनी यासंदर्भातील कथित ऑडिओ क्लिप प्रसारमाध्यमांसमोर आणली आहे. ही क्लिप महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपच्या एका ऑनलाइन मिटिंगमध्ये झालेल्या चर्चेची असल्याचे सांगितले जात आहे. या रेकॉर्डिंगमध्ये दोन महिलांमध्ये हिंदी भाषेत संवाद झाल्याचे ऐकू येते.
त्यापैकी एक महिला बोलताना जरांगे पाटील यांना आधीच 500 कोटी रुपये मिळाल्याचा दावा करते. हे पैसे श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून दिल्याचेही ती महिला संभाषणात सांगत असल्याचा दावा करण्यात आला आहे. दरम्यान, या ऑडिओ क्लिबाबत आम्ही कोणतीही पुष्टी करत नाही.
कोणतरी बोलणार एकाकडून घेऊन दुसऱ्याला ५०० करोड दिले म्हणजे पुरावा झाला??
रोज आमच्या कोकणाच्या कुठल्या ना कुठल्या टीट्यावर अमुकाने पैसे घेतले आणि अमुकाने पैसे दिले असे रोज चर्चा होतात, त्याचा बोलणाऱ्याला पण फरक पडत नाही आणि ऐकणाऱ्याला पण कारण कोणाकडून तरी ऐकलेलं असते.
जरांगे पाटील जरातरी माणुसकी आणि लाज स्वतःमध्ये जिवंत असायला पाहिजे होती.— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) October 22, 2026
जरांगे यांच्या या आरोपानंतर आता निलेश राणे यांनी पोस्ट शेअर करत यावर प्रतिक्रिया दिली आहे. निलेश राणे यांनी पोस्टमध्ये लिहिले की, “कोणतरी बोलणार एकाकडून घेऊन दुसऱ्याला ५०० करोड दिले म्हणजे पुरावा झाला?? रोज आमच्या कोकणाच्या कुठल्या ना कुठल्या टीट्यावर अमुकाने पैसे घेतले आणि अमुकाने पैसे दिले असे रोज चर्चा होतात, त्याचा बोलणाऱ्याला पण फरक पडत नाही आणि ऐकणाऱ्याला पण…”
“कारण कोणाकडून तरी ऐकलेलं असते. जरांगे पाटील जरातरी माणुसकी आणि लाज स्वतःमध्ये जिवंत असायला पाहिजे होती.” असे म्हणत निलेश राणे यांनी कथित ऑडिओ क्लिपवरून जरांगे यांना प्रत्युत्तर दिले आहे.
हेही वाचा:
Navratri Festival : नवरात्रोत्सवात अंबाबाईच्या दर्शनाला; भाविकांचा महापुर






