Pune News : पुणे-सातारा रस्त्यावरील शंकर महाराज वसाहतीमध्ये एक ७५ वर्षाची महिला घरात मृतावस्थेत आढळली. तीच्या अंगावरील दागिने आणि पिशवीतील रोकड मात्र गायब झाली होती. यामुळे महिलेचा मृत्यू नैसर्गिक आहे की घातपात अशी शंका उपस्थित झाली आहे. कुसूम पन्हाळे (७५, रा.शंकर महाराज वसाहत) असे मृत महिलेचे नाव आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल पवार यांनी सांगितले की, शुक्रवारी सकाळी शेजारच्यांना महिला घरामध्ये मृतावस्थेत आढळली. त्यांनी तातडीने पोलिसांना खबर दिली. पोली घटनास्थळी दाखल झाल्यावर मृतदेह ससून रुग्णालयात शवविच्छेदनाला पाठविण्यात आला. दरम्यान महिलेची मुलगी बालाजीनगर रहाते, तीला पाचारण करण्यात आले. मुलीने आईच्या अंगावरील चार तोळ्याचे दागिने आणि पिशवीतील २० ते २५ हजाराची रोकड चोरीला गेल्याचे सांगितले. मात्र घराचा कडी कोयंडा शाबूत होता. शवविच्छेदनाच्या अहवालानंतर मृत्यूचे कारण कळू शके