प्रभात वृत्तसेवा पुणे – कात्रज बाह्यवळण मार्गावर अवजड वाहनांस १५ ऑक्टोबरपासून कात्रजकडून किवळेकडे जाणाऱ्या मार्गिकेवर सकाळी ८ ते ११ वाजेदरम्यान, तसेच किवळे ते कात्रजकडे जाणाऱ्या मार्गिकेवर सायंकाळी ५ ते रात्री ९ वाजेपर्यंत जड, अवजड वाहनांना पुढील आदेश येईपर्यंत बंदी केली असल्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी जारी केले आहेत. या वेळेत सातारा-सांगली-कोल्हापूर बाजूने बेंगळुरू महामार्गावरून येणारी वाहने शिंदेवाडी टोलनाक्याच्या पुढे येणार नाहीत, तसेच नवी मुंबई, ठाणे, रायगड बाजूने बेंगलोर महामार्गावरून जाणारी वाहने उर्से टोल नाक्याच्यापुढे व जुना मुंबई-पुणे महामार्गावरील वाहने वडगाव फाट्याच्या पुढे प्रवेश करणार नाहीत. अत्यावश्यक सेवेतील वाहने व पुणे शहराच्या अंतर्गत भागातील वाहतुकीस हा बंदी आदेश लागू राहणार नाही, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहेत.