Pune News: पोलीस दडपशाहीविरोधात उद्या आंदोलन! आंबेडकर पुतळ्यासमोर विविध विद्यार्थी संघटनांचा सहभाग
Pune News: शहरात आयोजित आंदोलनावेळी पोलिसांनी पूर्वप्रसिद्धीनुसार धरपकड केल्याचा आरोप; लोकशाही अधिकार संघर्ष समितीची पत्रकार परिषदेत माहिती.

Pune News- दिल्लीतील एसआयआरविरोधात आंदोलनाला पाठींब्यासाठी शनिवारी (दि. १०) आणि रविवारी (दि. ११) आयोजित आंदोलनावेळी पुणे पोलिसांनी दडपशाही केल्याच्या विरोधात शुक्रवारी (दि. १६) जिल्हाधिकारी कार्यालयामागील आंबेडकर पुतळ्यासमोर आंदोलन करणार येणार आहे. ही माहिती माहिती लोकशाही अधिकार संघर्ष समितीने बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
केंद्र सरकार नागरिकांचा मतदानाचा अधिकार हिरावून देशातील नागरिकांना दुय्यम नागरिक बनवत आहेत, एसआयआरविरोधातील आंदोलन हे नागरिकांच्या निवडून देण्याच्या अधिकारासाठीचे आंदोलन आहे. तसेच आंदोलन हा नागरिकांचा मुलभूत अधिकार आहे. मात्र, हे आंदोलने होऊ नये म्हणून पुर्वनियोजित पद्धतीने झडप घालून आंदोलकांची धरपकड केली जात आहे.
पोलिसांच्या दडपशाहीचा आम्ही तीव्र निषेध करतो, असेही परिषदेत सांगण्यात आले. या परिषदेला सोमनाथ निर्मळ, सागर सविता धनराज, निमिश वाघ, निहारिका भोसले यांच्यासह विविध विद्यार्थी संघटनांने प्रतिनिधी उपस्थित होते. एसआयआरविरोधात शहरात शनिवारी (दि. १०) लाल महाल येथे मोर्चा काढण्यात येणार होता. रविवारी (दि. ११) गुडलक चौकात निदर्शने आयोजित केली होती.
आधी परवानगी नसल्याचा तर नंतर संभाव्य वाहतूक कोंडी हवाला देत दोन्ही आंदोलनातील आंदोलकांना पकडून ताब्यात घेतले गेले. नागरिकांच्या मुलभूत अधिकारांचे रक्षण करणे ही पोलिसांची घटनादत्त जबाबदारी आहे. त्यामुळे आम्ही तिथे आंदोलन करणार आहोत, असे या वेळी सांगितले.
पोलीसांनी डोळे उघडले..
नीट आंदोलनावेळी पोलीसांनी आम्हाला सहकार्य केले होते. तेव्हा आम्ही त्यांच्या बाजूने घोषणा देखील दिल्या होत्या. पुण्यातील पोलीस सांविधानिक हक्कांच्या आणि एकाअर्थाने आमच्या बाजूने आहेत, असा आमचा विश्वास होता. मात्र, या वेळी केलेल्या कारवाई पाहता आमचा विश्वास खोटा ठरला आहे. पोलीस कारवाईमुळे आमचे डोळे उघडे आहेत.





