Pune News : आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या गंभीर प्रकरणात एकास अटकपूर्व

Pune News : भिशीचे दोन लाख रुपये देत नसल्याने एका व्यक्तीने आरोपीच्या दुकानासमोर गाडीतील पेट्रोल ओतून स्वतःला पेटवून घेत आत्महत्या केली होती. या प्रकरणी मार्केट यार्ड पोलीस स्टेशन येथे मुकेश उणेचा याच्या विरुद्ध आत्महत्येस प्रवृत केल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. यामध्ये उणेचा याला अटकपूर्व जामीन मंजुर झाला आहे. बचाव पक्षातर्फे ॲड. विपुल दुशिंग, ॲड. अजित पवार आणि ॲड. प्रणित नामदे यांनी काम पाहिले. जामिनासाठी अर्ज दाखल केला होता.
याप्रकरणी मयत व्यक्तीच्या पत्नीने आरोपी याने डिसेंबर २०२४ मध्ये तीन लाख रुपयांपैकी भिशीचे दोन लाख रुपये देणार होता. परंतु तो पैसे देणे टाळत होता. मयत व्यक्तीस मी तुला आगपेटी देऊ का, अशी विचारणा केली व त्यास आत्महत्येस प्रवृत्त केले अशा आशयाची फिर्याद दाखल केली होती. या घटनेमध्ये आरोपी याचा कसलाही सहभाग नाही. पैसे देण्यास नकार देणे हे आत्महतेस प्रवृत्त करणे होऊ शकत नाही.
तसेच आरोपी याने मयत व्यक्तीस वाचवण्याचा प्रयत्न केला होता. मयत व्यक्तीचा मृत्यूपूर्व जबाब हा आरोपीचा अटकपूर्व जामीन नाकारण्यासाठी पुरेसा नाही. तसेच तुला पेटवून घेण्यासाठी आगपेटी देऊ का हे वाक्य जरी आरोपी बोलला असला तरी त्यामुळे मयत व्यक्तीने आत्महत्या केली असे सिद्ध होत नाही. असा युक्तिवाद बचाव पक्षाचा वतीने केलेला युक्तिवाद ग्राह्य धरत जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. पी. रागीट यांनी अटकपूर्व जामीन मंजूर केला. आरोपीच्या वतीने ॲड. विपुल दुशिंग यांनी युक्तिवाद केला. त्यांना ॲड. अजित पवार व ॲड. प्रणित नामदे यांनी सहकार्य केले.





