Tiger Shroff : प्रचंड आरडाओरड, गोंधळ, गर्दी अन्…; टायगर श्रॉफची तब्येत आता कशी आहे? अभिनेत्याला नेमकं काय झालं….
बॉलिवूडमध्ये आपल्या दमदार अॅक्शन, जबरदस्त स्टंट्स आणि फिटनेसच्या जोरावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारा अभिनेता म्हणजे टायगर श्रॉफ. टायगर श्रॉफ याने २०१४ मध्ये ‘हिरोपंती’ या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं.

Tiger Shroff : मुंबईत जुहू परिसरातील पुष्पा पार्क येथे अभिनेता ‘टायगर श्रॉफ‘ आणि त्याच्या चालकावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केल्याची अत्यंत खळबळजनक घटना समोर आली आहे. या अचानक झालेल्या हल्ल्यात अभिनेता टायगर श्रॉफ, त्याचा चालक आणि एक रिक्षाचालक जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तीन अनोळखी व्यक्ती दुचाकीवरून आले आणि त्यांनी अचानक टायगर श्रॉफवर गोळीबार केला. या हल्ल्याचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलिस आरोपींचा शोध सुरु केला असून, या गोळीबाराची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगने घेतली असल्याची माहिती समोर आली आहे.
तीन हल्लेखोरांनी हा गोळीबार केला आणि घटनास्थळावरून पसार झाले. या हल्ल्यात टायगर श्रॉफ थोडक्यात बचावला आहे. त्याच्या ड्रायव्हरच्या हाताला गोळी लागल्याने तोही थोडक्यात बचावला आहे. गोळी हातावर लागली नसती तर ड्रायव्हरच्या जीवावर बेतू शकलं असतं, असं सांगण्यात आलं आहे.
डीसीपी मोहित गर्ग यांनी टायगर श्रॉफवर झालेल्या हल्ल्याची माहिती दिली आहे. टायगर श्रॉफचा ड्रायव्हर फिरदौस यांच्या हाताला गोळी लागली आहे. एक बाजूला इसम उभा होता, त्यालाही गोळी लागली आहे.
मात्र, या हल्ल्यात टायगरचा ड्रायव्हर स्टेबल आहे. गोळीबारात दोन जण जखमी झाले आहेत. टायगर पूर्णपणे सुरक्षित असल्याची माहिती डीसीपी मोहित गर्ग यांनी दिली आहे. टायगर प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते जॅकी श्रॉफ यांचा मुलगा आहे.
बॉलिवूडमध्ये आपल्या दमदार अॅक्शन, जबरदस्त स्टंट्स आणि फिटनेसच्या जोरावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारा अभिनेता म्हणजे टायगर श्रॉफ. टायगर श्रॉफ याने २०१४ मध्ये ‘हिरोपंती’ या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं.
यानंतर टायगरने ‘बागी’, ‘अ फ्लाइंग जट्ट’, ‘मुन्ना मायकेल’, ‘बागी २’, ‘स्टुडंट ऑफ द इयर २’, ‘वॉर’, ‘बागी ३’, ‘हिरोपंती २’ आणि ‘गणपत’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं.







